केपटाऊन : जगातलं एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहारात आता २२ एप्रिलपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा उरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या शतकभरातल्या सर्वात भीषण दुष्काळानं आता रौद्र रुप धारण केलंय. येत्या २२ एप्रिलला शहरातल्या नळाला येणारं पाणी बंद होणार आहे. त्यामुळे २२ एप्रिलला 'डे झिरो' असं नाव देण्यात आलंय.


पाण्याची कमतरता बघता शहर प्रशासनानं खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रुपांतर करणारी यंत्रणा पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. 


तसंच भूगर्भातली पाण्याचा शोध घेण्यासाठी खोल विहिरी खोदण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. पण गेल्या तीन वर्षात पाऊसच पडलेला नसल्यानं प्रशासनही हतबल आहे. दरवर्षी साधारण २० लाख पर्यटक केपटाऊनमध्ये येतात.