Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक करोडपती वास्तव्यास असणाऱ्या न्यूयॉर्कने (New York) या यादीत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. Henley and Partners for 2024 ने हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये भारतातील दोन शहरांचा समावेश झाला आहे. भारतातील या दोन शहरांमध्ये लक्षाधीशांची संख्या वाढली असून चांगला विकास केला असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही शहरांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीला मागे टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Henley and Partners ने जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत आशिया पॅसिफिक प्रदेशातील लक्षाधीशांच्या संख्येत वाढ नोंदवली आहे. 2024 च्या रिपोर्टमध्ये टोकियो, सिंगापूर आणि बीजिंग यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती दर्शवली आहे. 


दिल्ली आणि मुंबई श्रीमंतांच्या यादीत


यादीनुसार, जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई 24 व्या स्थानावर आहे. मुंबई शहरात 58 हजार 800 लक्षाधीश आहेत. तसंच 236 सेंटी-मिलनियर आणि 29 अब्जाधीश आहेत. 2013 ते 2023 पर्यंत, मुंबईत लक्षाधीशांमध्ये 82 टक्के वाढ झाली आहे.


दरम्यान दिल्ली या यादीत 37 व्या स्थानावर आहे. दिल्लीने फार मोठी प्रगती दर्शवली आहे. दिल्लीने मॉस्को, वॉशिंग्टन डीसी या शहरांनाही मागे टाकलं आहे. गतवर्षी दिल्लीने लक्षाधीशांमध्ये 95 टक्के वाढ झाल्याचं दाखवलं होतं. Henley and Partners च्या अहवालानुसार, दिल्लीत सुमारे 30 हजार 700 लक्षाधीश, 123 सेंटी-मिलियन आणि 16 अब्जाधीश आहेत.


पहिली 10 शहरं कोणती? 


जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क आणि दे बे एरिआ ही दोन अमेरिकेतील शहरं आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जपानमधील टोकियो यानंतर अनुक्रमे सिंगापूर, लंडन, लॉस एंजेलिस, पॅरिस, सिडनी, हॉगकाँग आणि बिंजिंग यांचा समावेश आहे. 


न्यूयॉर्कच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा


प्रेस रिलीजमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्क शहराची एकूण संपत्ती USD 3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. हा आकडा G20 असणाऱ्या अनेक देशांच्या एकूण संपत्तीपेक्षाही जास्त आहे. न्यूयॉर्कमध्ये तब्बल 349,500 लक्षाधीश, 744 सेंटी-मिलिअनियर्स (100 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक असलेली संपत्ती), आणि 60 अब्जाधीश वास्तव्यास आहेत. 


तथापि, मागील वर्षांच्या तुलनेत, लंडनमध्ये घसरण झाली आहे, 2024 च्या अहवालानुसार, यूकेच्या राजधानीने गेल्या दशकात 10 टक्के लक्षाधीश गमावले. युरोपियन युनियनमधून बाहेर पडणं यामागील मुख्य कारण सांगितलं जात आहे.