Desis Fight Over Mangoes In London Market: सुपर मार्केटमधील शॉपिंग म्हणजे हजीर तो वजीर प्रकारची असते. म्हणजे तुमच्या हाती चांगली वस्तू लागली आणि तुम्ही ती विकत घेण्याची तयारी दाखवली तर ती तुमची असा काहीसाप्रकार सुपरमार्केटमध्ये अनेकदा दिसून येतो. खास करुन मर्यादित स्टॉक असलेल्या वस्तूंच्याबाबतीत तर अनेकदा हा प्रकार घडतो. अनेकदा अशा मर्यादीत गोष्टींवरुन वाद झाल्याचंही पहायला मिळतं. कोरोना कालावधीमध्ये युरोपबरोबरच अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये टॉयलेट पेपर्सवरुन अशाप्रकारची फ्री स्टाइल कुस्ती मॉलमध्येच झाल्याचं पहायला मिळालं आहे. भारतातही अनेकदा असे प्रकार घडतात. आता अशी हमरीतुमरी होणं काही नवं नाही. मात्र भारतीयांनी अशाप्रकारे एखाद्या गोष्टीसाठी परदेशातील सुपरमार्केटमध्ये वाद घातल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना? मात्र खरोखर असा प्रकार घडलाय लंडनमध्ये जिथे दोन पाकिस्तानी गटांमध्ये अगदी भारतामधील बाजारांमध्ये कधीतरी पाहयला मिळणाऱ्या हाणामारीप्रमाणे देसी स्टाइल तुफान हाणामारी झाली आणि ती सुद्धा आंबे खरेदीवरुन.


दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आंब्यांवरुन दोघांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे. लंडनमधील रस्त्यांवर शॉपिंग करत असतानाच दोन गटांमध्ये हा वाद झाला आहे. व्हिडीओमधील वाद घालणाऱ्यांचे लूक आणि वागण्यावरुन हे सर्वजण आशियामधील एखाद्या देशातील नागरिक असल्याचं वाटत आहे. व्हिडीओ शेअर केलेल्या व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार वाद झालेले दोन्ही गट हे पाकिस्तानी आहेत. सुरुवातीला या लोकांमध्ये बाचाबाची होते आणि नंतर हे लोक थेट फळ विक्रेत्याशी वाद घालू लागतात. दुकानदार आधी या ग्राहकांना ओरडतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला विशेष यश येत नाही आणि मग सुरु होते फ्री स्टाइल हाणामारी


अचानक हल्ला करतो अन्...


या दोघांमध्ये आंबे खरेदीवरुन वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहक दुकानदाराबरोबर वाद घालता घालता आक्रमक होतात. एकजण अचानक तिथेट ठेवलेलं धातूचं बास्केट उचलून दुकानदारावर हल्ला करतो. या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न काहीजण करतात मात्र त्यांच्यांबरोबरही ही व्यक्ती धक्काबुक्की करते. त्यानंतर दुकानातून काहीजण दुकानदाराच्या बाजूने भांडायला येतात आणि गोंधळ वाढतो. दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी होताना व्हिडीओत पाहायला मिळतं.



परदेशी बाजारामध्ये भारतीय लोक भांडतात तशाप्रकारे एकदम तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र सोशल मीडियावर या लोकांना ट्रोल केलं जात आहे. आंब्यासारख्या गोष्टीवरुन परदेशात जाऊन असा वाद घालणं शोभत नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.