दूषित हवेपासून तयार केलाय हिरा? विश्वास बसत नाही तर पाहा व्हिडीओ
प्रदूषित हवा करणार मालामाल? पण कसं पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : आतापर्यंत तुम्ही अनेक अनमोल हि-यांबद्दल ऐकलं असेल हिरे कुठे सापडतात, त्यांना पैलू कसे पाडले जातात हेही पाहिलं असेल. पण तज्ज्ञांनी एक भन्नाट शोध लावला आहे. आता दूषित हवाच तुम्हाला मालामाल करणार आहे. या हवेपासून खास एअर डायमंड तयार करण्यात आला आहे. वाचून धक्का बसला ना?
हवेतून सोनं किंवा अन्य एखादी वस्तू काढण्याची ही जादू तुम्ही अनेकदा बघितली असेल. पण हवेतून खरोखरच हिरा निघतो असं तुम्हाला सांगितलं तर ?
तुम्ही बघताय हा हिरा साधासुधा हिरा नाही. तो ना कोणत्या खाणीत सापडला, ना त्याला कोहिनूरसारखी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हा हिरा हवेपासून तयार करण्यात आल्याचा दावा न्यूयॉर्कच्या लक्झरी ज्वेलरी कंपनीनं केला.
वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचा उपयोग करून हा पहिला 'एअर डायमंड' तयार केल्याचा दावा या कंपनीनं केलाय. चार टप्प्यात हि-याची निर्मीती करण्यात आलीये. पहिल्या टप्प्यात रिऍक्टरचा वापर करून वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड वेगळा करण्यात आला.
त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीनं हायड्रोकार्बन सिन्थेसिस प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईडचं रूपांतर हायड्रोकार्बनमध्ये झालं. शेवटच्या टप्प्यात याच हायड्रोकार्बनला रसायनांची वाफ देऊ हि-याच्या खड्यांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर त्याला पैलू पाडण्यात आले.
हवेपासून तयार करण्यात आलेले हिरे अनमोल असल्याचा दावा करत त्यांची किंमत जाहीर करण्यास कंपनीनं नकार दिलाय. वातावरणातील प्रदुषणाचं रुपांतर असं हि-यांमध्ये करण्याची योजना आहे. असं झालं तर ज्वेलरी विश्वात मोठी क्रांती ठरेलच, पण प्रदुषण कमी करण्यासही मदत होईल.