Viral News : कोणी जन्मजात श्रीमंत असतो तर कोणी आपल्या मेहनतीच्या बळावर भरपूर पैसे कमावतात. तर काही लोक इतके नशिबवान असतात की काही न करता त्यांना बसल्या जागेवर पैसे मिळतात. श्रीमंत होण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणून लोक लॉटरी खरेदी करतात. जर ती लॉटरी जिंकल्यावर ते क्षणात करोडपती किंवा अब्जाधीश होतात. अशीच लक्ष्मीची कृपा बसल्या जागेवर एक महिलेवर झाली. एका क्षणात लॉटरीचं तिकीट जिंकून ती अब्जाधीश झाली. तिला 114 दशलक्ष पौंड म्हणजेच 12,16,09,15,800 रुपये मिळाले. त्या पैशातून तिने सर्वात प्रथम काय खरेदी केलं हे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. (Did she see what she bought first after winning the lottery of Rs 12160915800 viral news)


लॉटरीमध्ये जिंकले 12 अब्ज रुपये!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मीची कृपा बरसली त्या महिलेचं नाव आहे फ्रान्सिस कोनोली. ती 58 वर्षीय असून तिला 114 दशलक्ष पौंड म्हणजेच 12,16,09,15,800 रुपयांची लॉटरी लागली. एवढा पैसा मिळाल्यावर आपला आनंद गगणात मावत नाही. त्या पैशातून आपण बंगला, कार आणि अनेक ऐशोआरामाच्या गोष्टी विकत घ्यायचं ठरवतो. पण या महिलेने लॉटरीची पैसे जिंकल्यानंतर सगळ्या पहिले काय विकत घेतलं आणि त्या पैशांचं काय केलं हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. 


ती आणि तिचा उद्योगपती पती पॅट्रिक त्यांनी लॉटरी जिंकल्यानंतर ती पैशासह हार्टलपूलला गेली. हा पैसा आपल्या ऐषोआरामावर खर्च करण्याऐवजी तिने इतरांना मदत करण्यासाठी त्या पैशांचा उपयोग केला. त्याशिवाय दोन धर्मादाय संस्था स्थापन केल्या. 


फ्रान्सिस या महिलेने जेव्हा विचारण्यात आलं की, इतके पैसे मिळाल्यानंतर तुम्ही पहिलं काय खरेदी केलं? यावर तिने अतिशय शांतपणे सांगितलं की, या पैशातून आपण प्रथम स्वत:साठी एक चड्डी खरेदी केली होती. जेव्हा फ्रान्सिसने लॉटरी जिंकली तेव्हा तिच्या पतीला दक्षिण लंडनमध्ये एका नवीन कंपनीत कामावर जायचे होतं. मात्र त्याचा विचार बदलला. या जोडप्याला तीन मुली आहेत आणि त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कुटुंबासाठी आणि धर्मादाय संस्थेसाठी £60 दशलक्ष देणगी दिलीय. खरंच श्रीमंत ही नुसती पैशांची नसते ती मनाचीही हवी. लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा आपल्या हातातील पैसा इतरांना आनंद आणि मदतीसाठी उपयोग आला ते त्याला महत्त्व आहे.