US President Election : प्रसिद्ध अॅनिमेटेड सिरीज द सिम्पसन्स (The Simpsons) गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. द सिम्पसन्सच्या आश्चर्यकारक अंदाजांमुळे ही सिरीज सोशल मीडियावर चर्चेत असते. 20 वर्षांपूर्वी द सिम्पसन्स या शोने कमला हॅरिस (Kamala Harris) या युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्षा होऊ शकतात असे संकेत दिले होते. अशातच आता जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता कमला हॅरिस पुन्हा राष्ट्राध्यक्षा होणार का? असा सवाल विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार होणार अशी सिम्पसन्सची भविष्यवाणी खरी ठरली होती. अशातच आता पुन्हा हा शो चर्चेत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला होईल, असं भाकित सिम्पसन्सने केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अशातच आता याच सिम्पसनच्या सीझन 11, एपिसोड 17 मध्ये लिसा अध्यक्ष ट्रम्प यांनी सोडलेल्या बजेटच्या समस्येवर चर्चा करताना दिसत आहे. यामध्ये कलाकाराने परिधान केलेला ड्रेस सेम टू सेम कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीला घातला होता. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.



2000 साली प्रसारित झालेला हा भाग चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यावरून अनेक दावे देखील केले जात आहेत. द सिम्पसन्स ही एक ॲनिमेटेड कॉमेडी मालिका, स्प्रिंगफील्ड शहरातील सिम्पसन कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे. या सिरीजचा डायरेक्ट कोण आहे? याची कोणालाही माहिती नाही. हा डायरेक्ट टाईम ट्राव्हल करून आलाय, अशी देखील मान्यता आहे.


दरम्यान, जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेताना कमला हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिकागो येथे पुढील महिन्यात होत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीत कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. कमला हॅरिस यांच्याशिवाय केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशीर, बायडेन प्रशासनातील वाहतूक मंत्री पीट बटिगीग यांची नावं देखील चर्चेत आहेत.