Dinosaur shiva: अर्जेंटिनामध्ये एक विशालकाय डायनासोरचे जीवाश्म शोधण्यात आलंय. हा डायनासोर 9 कोटी वर्षांआधी येथे वास्तव्यास होताय ज्याची मान चे शेपटीपर्यंतची लांबी 98 फूट इतकी होती. या डायनासोरचे नाव शंकर भगवानाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. संशोधकांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस पश्चिमी अर्जेंटिनामध्ये बस्टिंगोकीटिटन शिवचा शोध लावला होता. आता या डायनासोरचा व्हिडीओ आणि फोटो बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी वैज्ञानिक आर्टिस्टची मदत घेऊ लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 डिसेंबर 2023 ला एक्टा पेलियोन्टोलोगिका पोलोनिका पत्रिकेमध्ये यासंदर्भातील अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार शिव हा आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या सॉरोपोड्सपैकी एक आहे. याचे वजन साधारण 74 टन होते. असे असले तरी हा सर्वात मोठा डायनासोर नव्हता. 


दक्षिण अमेरिकेचया उत्तरी पैटागोनिया क्षेत्रात शिवला शोधण्यात आले. 55 टनापेक्षा अधिक वजनाचे मेगाटिटानोसॉर टायटानोसॉर वेगळे विकसित झाले असे या शोधातून स्पष्ट झाले. जीवाश्म विज्ञान अभ्यासाच्या प्रमुख लेखिका मारिया एथिज सायमन यांनी दिली.


शेतकऱ्याला सापडले होते हाड 


पैटागोनिामध्ये आम्ही अशा टप्प्यात आहोत जिथे आमच्याकडे असल्या माहितीपेत्रा जास्त काही मिळण्याची शक्यता आहे. माहिती नसलेली गोष्ट नेहमी अद्भुत असते, असे सायमन यांनी सांगितले. प्रकाशनात आम्ही सॉरोपॉडवर रिपोर्ट केला जो आपल्या समुहातील इतरापेंक्षा विशालकाय बनला. लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे.


मॅन्युअल बस्टिंगोरी नावाच्या एका शेतकऱ्याला 2000 साली न्यूक्वेन प्रांतात आपल्या जमिनीवर पहिल्यांदाच बी.शिवचे विशाल जिवाश्म सापडले. 2001 साली शेती नागंरली होती, असे सायमनने सांगितले.  


9 कोटी वर्षांपुर्वी होते डायनासोर 


जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तुटलेले हाड पाहणे रोमांचकारी होते. पण ही केवळ सुरुवात होती, असे सायमनने सांगितले. संशोधकांना नव्या प्रजातीच्या कमीत कमी 4 डायनासोरचे अवशेष मिळाले. ज्यामध्ये एक पूर्ण हाडांचा सांगाडा आणि 3 अन्य अर्धवट नमुने होते. बी. शिव हा डायनासोर 9.3 कोटी ते 9.6 कोटी वर्षे जुन्या हुइनकूल पर्वतांमध्ये सापडला. येथे अर्जेटीनोसॉरस सापडला होता. त्याच्या हाडांमधील विशेषण ज्ञात सॉरोपॉड प्रजातींशी मिळतीजुळती नव्हती.