मुंबई : एक खळबळजनक बातमी अंडरवर्ल्डमधून... पाकिस्तान आणि दुबईनं मिळून भारताच्या पाठीत खंजीर खुपलाय. पाकिस्ताननं दुबईला फसवलं... मग दुबईनं भारताच्या पाठीत खंजीर खुपलाय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय तपास यंत्रणांच्या गुप्त माहितीवरून दुबईत अटक झालेल्या अंडरवर्ल्डच्या एका कुख्यात आरोपीला दुबई सरकारनं पाकिस्तान सरकारच्या हाती सोपवलंय.


भाजपचे नेते हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी फारुक देवाडीवाला दुबई पोलिसांनी भारतीय गुप्तचारांनी दिलेल्या माहितीवरून अटक केली. पण फारुख देवाडीवालानं त्याच्या गुन्हांची कबुली दिली... तर पाकिस्तानी सरकार समर्थित दहशतवादाचा बुरखा संपूर्ण जगासमोर टराटरा फाटला असता...याच भीतीनं पाकिस्ताननं कारस्थान रचलं.


पाकिस्ताननं खोटी कागदपत्र बनवली आणि देवाडीवाला पाकिस्तानी नागरिक असल्याचं भासवून त्याचा ताबा मिळवला... आणि आता देवाडीवाला आणि त्याचा आणखी एक साथीदार जीवाचं 'पाकिस्तान' करत मोकाट फिरत आहेत.


कोण आहे फारुक देवाडीवाला 


- भाजपचे नेते  हरेन पांड्या यांची सुमारे पंधरा वर्षांपूर्वी हत्या झाली


- फारुक देवाडीवाला या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे


- देवाडीवाला दाऊदचा उजवा हात मानला जातो


- नुकतंच मुंबई एटीएसनं  दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत देवाडीवालानं पाकिस्तानात दहशतवादी कृत्यासाठी प्रशिक्षण घेतल्याचं पुढे आलंय


- दुबई पोलिसांनी फारूखचा आणखी एक साथीदार सॅमलाही अटक केलीय


- आता सध्या दोघेही पाकिस्तानात असल्याची सूत्रांची माहिती आहे