What is Disease X: जगात काही देशांमध्ये कोरोना व्हायरसचा (Covid-19) धोका अद्यापही कायम आहे. अनेक देशात कोरोनाचे नववने व्हेरिएंट समोर आले असून यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशातच तज्ज्ञांनी एका नव्या आजाराची भीती व्यक्त केली आहे. हा आजार कोविड-19 पेक्षा सातपट जास्त धोकादायक असल्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे जवळपास 5 कोटी लोकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन अर्थात WHO ने या आजाराला डिजीज एक्स (Disease X) असं नाव दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांनी व्यक्त केला धोका
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन अर्थात WHO ने डिसिज एक्स हा आजार कोविड-19 पेक्षा जास्त भयानक असल्याचं म्हटलं आहे. या आजाराचा फैलाव झाल्यास जवळपास पाच कोटी लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यता आली आहे. या आजाराचा सामना करणं आव्हानात्मक असल्याचंही WHO ने म्हटलं आहे. 


1918-19 मध्ये एका अज्ञात माहामारीने जगभरातील 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. हाच व्हायरस पुन्हा सक्रीय झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. 


डिजीज X चा धोका 
डिजीज X ( Disease X ) नेमका कोणत्या व्हायरसमुळं हे अजून समजू शकलेलं नाही
व्हायरस, बॅक्टेरिया किंवा फंगसमुळं हा आजार होत असावा, असा अंदाज आहे
हा संसर्गजन्य रोग जगासाठी धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं 2018 मध्येच स्पष्ट केलं होतं
या रोगावर सध्या कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही
डिजीज X मुळं पृथ्वीवरील मानवी अस्तित्व नष्ट होण्याचा धोका संभवतो, अशीही चर्चा आहे


डिजीज एक्स ( Disease X ) हा डिसीज नेमका काय आहे, याची कुणालाच कल्पना नाही. मात्र या आजाराची साथ संपूर्ण जगातील मानवजातीला संकटात टाकू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हा आजार कोरोना ( Covid 19 ) पेक्षाही भयंकर, खतरनाक आणि प्राणघातक अशी ही डिजीज एक्सची साथ असेल. या महामारीमुळे पृथ्वीतलावरील मानवी अस्तित्व देखील नष्ट होण्याचा धोका संभवतो, अशी चर्चा आहे.


WHO ने 2018 मध्येच या आजाराचा इशारा दिला होता. शास्त्रज्ञांची टीम ज्या अज्ञात "डिसीज एक्स" वर चर्चा करतेय तो प्रत्यक्षात नवीन नाही. 2018 मध्येही, एका अहवालात नमूद केलंय की, डिजीज X- आपल्या जगासाठी सर्वात मोठा संसर्गजन्य धोका बनू शकतो. त्यामुळे या डिसीजबाबत जागतिक आरोग्य संघटनेने आधीच इशारा दिला होता.