अमेरिका : भारताप्रमाणेच जगभरात दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवे लावून काही भारतीय अधिकारी आणि सहकार्‍यांसोबत दिवाळी साजरी केली. 


जॉर्ज बुश यांनी व्हाईट हाऊसमध्येही त्यांच्या कार्यकालात दिवाळी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. पण स्वतःहून कोणत्याच  कार्यक्रमात सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर व्हाईट हाऊसमधील  इस्ट रूम ऑफ व्हाईट हाऊसमध्ये सेलिब्रेशनला सुरूवात केली. ओबामांनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकालातील पहिली दिवाळी साजरी केली. 



 


डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीयांनी अमेरिकेच्या शिक्षण, वैद्यकीय, साहित्य, विज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले आहे. डोनाल्ड ट्र्म्प सोबतच त्यांची मुलगी इंवाकानेदेखील व्हाईट हाऊसमधील सेलिब्रेशनमध्ये सहभाग  घेतला होता.