Cigarette Butt Solved Murder Mistry: सिगारेटचं व्यसन हे जीवघेणं असतं हे आपल्यापैकी सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र सिगारेटच्या मदतीने एखादं हत्येचं प्रकरण (Murder Case) सोडवण्यात पोलिसांना यश आलं असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र एखाद्या चित्रपटाची कथा वाटवी अशी घटना खरोखर घडली आहे. अमेरिकेतील पोलिसांनी एका गुन्ह्याची उकल तब्बल 52 वर्षानंतर केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आरोपी एका सिगारेट बटच्या मादतीने शोधला आहे.


24 वर्षीय शिक्षिकेची झालेली हत्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेमधील एका 24 वर्षीय शिक्षिकेची 52 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. मागील पाच दशकांहून अधिक काळापासून हा खटला सुरु होता. या महिलेच्या मृतदेहाजवळ एक सिगारेटचं बट (म्हणजेच सिगारेट पिताना मागील बाजूला असलेला कापसाचा वापर करुन बनवलेला भाग) सापडलं होतं. सिगारेट बटवर सापडलेल्या डीएनएच्या नमुन्यांच्या आधारे पोलिसांनी तब्बल 52 वर्षानंतर ही केस पूर्णपणे सोडवली आहे. या सिगारेटच्या मदतीने पोलिसांनी या 24 वर्षीय रीटा कर्रन या महिलेची हत्या करणाऱ्याचा शोध घेतला. रीटाची हत्या तिच्या शेजरी राहणाऱ्या व्यक्तीनेच केली होती. गळा चिरुन त्याने रीटा यांची हत्या केली होती.


मृतावस्थेत रुममध्ये आढळून आली


रीटा या 19 जुलै 1971 रोजी त्यांच्या रुममेट्सला त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झालेला विलियम डेरुस हा रीटा राहत असलेल्या इमारतीमध्येच वास्तव्यास होता. मात्र त्यावेळी कधीच त्याच्यावर पोलिसांनी संक्षय घेतला नव्हता. पोलिसांच्या गुप्तहेर विभागाचे कमांडर जिम ट्राइब यांनी, 'डेरुस आणि त्याची पत्नी मिशेल यांनी त्यावेळी जबाब नोंदवताना हत्या झाली त्या दिवशी आम्ही घरीच होतो मात्र आम्हाला काहीही संशयास्पद ऐकू आलं नाही किंवा दिसलं नाही, असं सांगितलं होतं,' अशी माहिती दिली.



तो थायलंडला गेला नंतर अमेरिकेत आला


नंतर या प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला. मात्र या प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना एक सिगारेटचा तुकडा घटनास्थळी आढून आला. या सिगारेटच्या तुकड्यानेच या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत केली. हत्या करणारा विलियम नंतर आपल्या पत्नीली सोडून बौद्ध भिक्षु बनण्यासाठी थायलंडला गेला. तो 1974 साली पुन्हा अमेरिकेत आला. सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये तो वास्तव्यास होता. त्यानंतर 1989 साली तो ड्रग्सच्या आहारी गेला. सॅन फ्रॅन्सिस्कोमधील एका हॉटेलमध्येच त्याचा मृत्यू झाला.


...अन् आरोपी सापडला


2014 साली सिगरेटच्या डीएनए प्रोसेसिंगला रेकॉर्डमध्ये जमा करण्यात आलं. डीएनए रेकॉर्डमध्ये असं दिसून आलं की रीटाची हत्या झाली त्या दिवशी तिने परिधान केलेल्या जॅकेटवरील नमुन्यांपैकी डीएनएचा एक नमुना डेरुसच्या डीएनएच्या एका सिक्वेन्सशी मॅच झाला. हत्येच्या 50 वर्षानंतर तपास यंत्रणांनी विलियम डीरुसची पत्नी मिशेलची या प्रकरणामध्ये चौकशी केली. मिशेलला काही प्रश्न विचारण्यात आले आणि तिला ट्रॅक करण्यात आलं. डिटेक्टीव्ह लेफ्टिनंट जेम्स ट्राइब यांनी, "तिने आम्हाला काही रंजक माहिती सांगितली. मिशेलचं आणि तिच्या पतीचं त्या रात्री भांडण झालं होतं. राग शांत करण्यासाठी तो हत्या झाली त्या रात्री इमारतीखाली चालायला गेला होता. तसेच त्याने तिने असा सुद्धा सल्ला दिला होता की पोलिसांनी भविष्यात या रात्रीसंदर्भात काही विचारलं तर आपण घरातच असल्याचा जबाब नोंदवावा," अशी माहिती दिली.