नवीन कपडे वापरायला काढण्याआधी धुवून का घालावेत?
Shopping Safety Tips : शॉपिंगला जाणं किंवा ऑनलाइन शॉपिंग करण्याची तुम्हालाही आहे सवय... त्यातही नवीन कपडे घेतले की न धुता करता परिधान... आजचं बंद करा ही चूक नाही तर मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड... जाणून घ्या त्या मागची कारण...
Shopping Safety Tips : आजकाल प्रत्येक व्यक्तीला शॉपिंग करायला आवडते. इतकंच काय तर शॉपिंग करण देखील खूप सोपं झालं आहे. घरच्या घरी बसून देखील आपण ऑनलाइन अॅप्सच्या मदतीनं शॉपिंग करू शकतो. ऑनलाइन बऱ्याचवेळा आपल्याला हवे ते नवीन ट्रेंडचे कपडे पाहायला मिळतात आणि ते आपण लगेच कुठे न जाता विकत घेतो. आजही काही लोक आहेत ज्यांना मॉलमध्ये जाऊनच शॉपिंग करायला आवडते. बरेच लोक असे आहेतच जे कोणताही विचार न करता कपडे एकदा आपण विकत घेतले किंवा मग ऑर्डर केलेले कपडे घरी आले की ते आपल्याला होत आहेत की नाही ते तपासतात. समजा ते कपडे त्यांना फीट झाले की ते धुता परिधान करतात. पण तुम्हाला माहितीये जर तुम्ही नवीन कपडे घेतले आणि ते न धूता तुम्ही बाहेर परिधान करून गेलात तर त्यानं तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.
तज्ज्ञांचे मते जेव्हा आपण कपडे विकत घेतो तेव्हा ते कपडे हजारो लोकांनी परिधान केलेले असतात. तर अशा पद्धतीनं कोणत्या व्यक्तीला काही आजार असेल तर तो तुम्हाला होण्याची शक्यता आहे. बऱ्याचवेळा अशात अनेकांना त्वचेचे संसर्ग होतात. पण जर तुम्ही कपडे आधीच धुतले तर संसर्ग होण्याचा धोका हा कमी असतो.
आपण कपडे खरेदी करतो त्यावेळी ही गोष्ट माहित असणे गरजेचं आहे की कपड्यांची क्वालिटी चांगली रहावी यासाठी खूप केमिकल वापरण्यात येतात. अनेकदा आपण नवीन कपडे परिधान करतो तेव्हा त्यातून सुगंधी वास येतो हे तुमच्या लक्षात आलं असेलच. तर त्याचे कारण म्हणजे कपड्यांवर किडे येऊ किंवा खराब होऊ नये यासाठी असतात. अनेकांना या केमिकल्समुळे अॅलर्जी होतात.
हेही वाचा : वनिता खरातनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील’ हा कलाकार करतोय कोकण सफारी, फोटो व्हायरल
न धुता कपडे का परिधान करू नये, त्याचं कारण म्हणजे त्यात असलेल्या बॅक्टेरियामुळे त्वचेची जळजळ, पुरळ, मुरुम यासारख्या समस्या होऊ शकतात. उन्हाळ्यात आपण जेव्हा शॉपिंग करण्यासाठी जातो तेव्हा आपल्या अंगावर घाम असताना आपण कपडे ट्राय करतो हे इतरांसोबत देखील होतं. यामुळे संसर्ग पसरतात.
तुम्ही जर अंडरगार्मेंट्स घेत असाल तर तेव्हा खूप काळजी घ्या कारण अशात इन्फेक्शन होण्याची समस्या असते. फक्त इतकंच नाही तर पॅन्ट, जीन्स आणि ट्राऊजर विकत घेताना या गोष्टी लक्षात राहू द्या कारण कोणाला फंगल इन्फेक्शन सारखी काही समस्या असेल तर ती तुम्हालाही होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)