मुंबई : आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्याला त्याचा स्वतंत्र असा इतिहास आणि त्याचं महत्तव असतं. आपरण दररोजच्या वापरात अनेक गोष्टी वापरतो. त्यापैकी एक महत्वाचा भाग म्हणजे अंडरवेअर. गुप्तांग (Private Part) सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वच अंडरवेअरचा वापर करतो. अंडरवेअर आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवतं. आज आपण विविध प्रकारच्या अडंरवेअर्स परिधान करतो. पण आपण अंडरवेअरकडे दररोजच्या वापराच्या पुढे कधीच पाहत नाही. आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या या अंडरवेअरचा स्वतंत्र असा इतिहास आहे. सुरुवातीच्या काळात अंडरवेअर कशा होत्या, त्याचा कालांतराने कसा कसा विकास होत गेला, तसेच त्याबाबत रोचक बाब याबाबत जाणून घेऊयात. (do you know underwear history)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राचीन काळी लोकं गुप्तांगावर केवळ कपडा बांधायचे. त्यामुळे त्यावेळेस अंडरवेयरला विशेष स्थान नव्हतं.  सबलिगॅकुलम हा एक प्रकारचा अंडरगारमेंट होता जो प्राचीन रोमकरांनी परिधान केला होता जो लंगोट सारखाच होता. गुप्तांगाला कापडाने झाकलं जायचं. विशेष म्हणजे स्त्री पुरुष दोघेही याचा वापर करायचे. त्यावेळेस याला लंगोट असं न म्हणता  सबलिगॅकुलम म्हटलं जायचं.


रिपोर्टनुसार, मध्ययुगीन काळात पुरुषांनी लिनेन शॉर्ट्स घालण्यास सुरुवात केली, ज्याला ब्रेज म्हटलं जायचं. पण स्त्रिया अजूनही कपड्यांचा वापर करायच्या.  महिलांनी 19 व्या शतकात  अंडरवेयरचा वापर करायला सुरुवात केली. स्त्रिया फक्त एकच कापड वापरत असत, ते त्यांच्या ड्रेसखाली घालायचे. या विशिष्ट 'अंडरवेअर' ला शिफ्ट असे म्हटलं जायचं . मग 16 व्या शतकात महिलांनी  कॉर्सेट घालायला सुरवात केली.
 
यानंतर, 19 व्या शतकात त्याचा ट्रेंड वाढला आणि अनेक प्रकारच्या अंडरवेअरची निर्मिती करण्यात आली. सर्वात आधी अंडरवेअर योद्धांच्या सोयीनुसार बनवण्यात आली होती. मात्र त्यानंतर यामध्ये काळानरुप यामध्ये बदल होते गेले. 
  
पुरुष आणि स्त्रियांच्या अंडरवेयरचा आकार आधी खूप मोठा होता.  मात्र त्यानंतर तो आकार कमी होऊ लागला. मग 1950 च्या दशकापर्यंत स्त्रियांनी बिकीनीचा वापर वाढवला. तर पुरुषांच्या अंडरपॅन्ट्सचा आकार लहान होऊ लागला.