पार्टीनंतर तरुणांनी मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवली व्होडका बॉटल; करावं लागलं ऑप्रेशन
Doctors Remove Vodka Bottle From Stomach: या तरुणाला दारु पाजल्यानंतर त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या तरुणाचे अनेक मित्र फरार असल्याने पोलीस सध्या या तरुणांचा शोध घेत आहेत.
Vodka Bottle Removed From Stomach: नेपाळमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला असून यासंदर्भात समजल्यानंतर रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनाही मोठा धक्का बसला आहे. येथील एका 26 वर्षीय तरुणाच्या पोटामध्ये एवढं दुखू लागलं की त्याची शस्त्रक्रिया करावी लागली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर या तरुणाच्या पोटातून चक्क एक व्होडकाची बाटली बाहेर काढण्यात आली. ही विचित्र घटना रौतहट जिल्ह्यामधील गुजरा नगरपालिका क्षेत्रात घडली. येथील नूरसाद मंसूरी नावाच्या तरुणाच्या पोटात अचानक दुखू लागलं. चाचण्या केल्यानंतर तातडीने या तरुणाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्या पोटातून एक बाटली बाहेर काढण्यात आली. नेमका घटनाक्रम समजल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून या प्रकरणात आता एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
आतडं फाटलं...
या तरुणाला 5 दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात पोटदुखीच्या समस्येसाठी दाखल करण्यात आल्याचं 'द हिमालयन टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या तरुणाच्या पोटातून बाटली काढण्यासाठी करण्यात आलेली शस्त्रक्रिया जवळजवळ दीड तास सुरु होतं. या तरुणावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममधील एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, "बाटलीमुळे या तरुणाचं आतडं फाटलं होतं. त्यामधून पचनानंतर उरलेल्या अन्नाचा चोथा बाहेर पडत होता. म्हणूनच त्याच्या पोटात दुखत होतं. त्याच्या आतड्याला सूज आली आहे. मात्र आता शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या जिवाला कोणताही धोका नाही."
पोलिसांना शंका की...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका पार्टीमध्ये या तरुणाला त्याच्या मित्रांनी दारु पाजली. त्यानंतर त्याच्या गुप्तांगामधून त्याच्या शरीरात ही व्होडकाची बाटली घुसवली. पोलिसांनी आपल्या अहवालामध्ये या तरुणाच्या गुद्दद्वाराच्या माध्यमातूनच ही बाटली शरीरात गेली, अशी शंका व्यक्त केली आहे.
अनेकजण फरार
रौतहट पोलिसांनी या प्रकरणामध्ये शेख समीमला अटक केली आहे. नूरसादच्या काही मित्रांचीही चौकशी पोलिसांनी केली आहे. चंद्रपूर क्षेत्रीय पोलिसांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, "पोलिसांना समीमनेच हा प्रकार केल्याची शंका आहे. त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नूरसदचे इतर मित्र फरार आहेत. त्यामुळे या मित्रांच्या टोळक्यानेच हा प्रकार केला असल्याची दाट शक्यता असून या सर्व मुलांचा शोध घेतला जात आहे.