Dog killed owner: कुत्रा हा इमानदार पाळीव प्राणी मानला जातो. कुत्रा हा आपल्या घराचं रक्षण करतो, असंही आपण लहानपणी शिकवण्यात येतं. तुम्हालाही कुत्रा आवडत असेल. या आवडीने तुम्हीही घरी कुत्रा पाळला असेल... मात्र आता आम्ही तुम्हाला जी खरी घटना सांगणार आहोत, त्यामुळे तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. ही घटना टर्कीची असून कुत्र्याने गोळी चालवून स्वतःच्याच मालकाचा जीव घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टर्कीमध्ये नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेमुळे कुत्र्याने अनावधानाने त्याच्या मालकाचा जीव घेतला आहे. 


केव्हा घडली ही घटना?


टर्कीमध्ये सॅमसन भागात ही घटना घडलीये. या ठिकाणी राहणाऱ्या 32 वर्षांचे ओजगुर गेवरेकोग्लू याला शिकारीची फार आवड होती. अनेकदा तो जंगलात शिकारीसाठी जायचा. छंद म्हणून त्याने कुत्रेही पाळले होते. यावेळी तो बाहेर जाताना एकाद्या कुत्र्याला घेऊन बाहेर पडायचा. त्यादिवशी तो जंगलात शिकारीसाठी गेला असता एका कुत्र्याला घेऊन गेला. आणि तेव्हाच ही दुर्घटना घडली.


चुकून सुटली गोळी


यावेळी ओजगुरने त्याची शॉटगन कारबूटमध्ये ठेवण्याची तयारी केली होती. ही गन ठेवत असतानाच त्यांचा कुत्रा धावत आला आणि त्याने अचानक गनवर उडी मारली. मुख्य म्हणजे ही शॉटगन लोडेड होती. यावेळी नेमका ट्रिगरवरच कुत्र्याचा पाय पडल्याने गनमधून गोळी झाडली गेली गन ठेवण्यासाठी वाकलेल्या ओजगुरला ती गोळी लागली.


या घटनेत ओजुगरचा जागीच मृत्यू झालाय. कुत्र्याने अचानक उडी मारल्याने त्याला स्वतःचा बचाव करताच आला नाही. ही गोळी त्याचा शरीरात घुसली त्याने जागीच प्राण सोडले, अशी माहिती पोलिसांना मिळालीये.