मादीला आकर्षित करण्यासाठी डॉल्फिन देतात `हे` गिफ्ट!
मुलींना इंप्रेस करण्यासाठी मुलं काय नाही करत? त्यांना शक्य ते सर्व काही करतात.
मेलबोर्न : मुलींना इंप्रेस करण्यासाठी मुलं काय नाही करत? त्यांना शक्य ते सर्व काही करतात. गिफ्ट देणे हा त्यातील एक भाग.
मादीला आकर्षित करण्यासाठी गिफ्ट
प्रेम व्यक्त करण्याची ही वृत्ती फक्त माणसांमध्ये नाही तर पशु-पक्षांमध्ये देखील आढळून येते. माणसाळलेला मासा म्हणून प्रसिद्ध असलेला डॉल्फिन मादीला आकर्षित करण्यासाठी गिफ्ट देतो. हे गिफ्ट म्हणजे रंगीन कागदात लपेटलेली वस्तू नसून डॉल्फिन शरीरातून वेगवेगळे आवाज काढतात. त्याचबरोबर काहीतरी खास पराक्रम करण्याचा प्रयत्न करतात.
वैज्ञानिकांनी लावला शोध
वैज्ञानिकांनी उत्तर-पश्चिम आस्ट्रेलियातील डॉल्फिन्सवर एक दशकापर्यंत शोध केला. यात आस्ट्रेलिया विश्वविद्यालयातील तज्ञ देखील सहभागी होते. त्यांच्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. ही माहिती जर्नल साइंटिफिक रिपोर्टमध्ये प्रसिध्द झाली आहे.