नवी दिल्ली : आजचा दिवस संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण आज जगातील 2 शक्तीशाली देशांचे प्रमुख डोनाल्ड ट्रंप आणि किम जोंग उनने सिंगापूरमध्ये एकमेकांची भेट घेतली. सिंगापूरमध्ये झालेल्या या ऐतिहासिक बैठकीकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं. याआधी दोन्ही देशांचे नेते एकमेकांवर हल्ले करण्याच्या गोष्टी करत होते. एकमेकांना धमक्या देत होते पण शेवटी दोन्ही देशांचे प्रमुख एकमेकांच्या भेटीसाठी तयार झाले.



अमेरिका आणि नॉर्थ कोरिया यांच्यात 1945 पासून संबंध फारच वाईट होते. आतापर्यंत दोन्ही देश एकमेकांना शत्रू मानत होते. किम जोंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांसमोर झुकायला तयार नव्हते. एकमेकांवर टीका होत होती ज्यामुळे संबंध आणखीनच खराब होत गेले. दोन्ही देशांमध्ये युद्ध होणार का अशी देखील चर्चा होत होती.