ट्रंप यांनी केला मोदींना फोन, भारत आणि अमेरिकेत सहयोग वाढवणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. `भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच ट्रंप यांनी म्हटलं की, दोन्ही देश चर्चा करुन एकमेकांचे सल्ले घेऊ.`
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. 'भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच ट्रंप यांनी म्हटलं की, दोन्ही देश चर्चा करुन एकमेकांचे सल्ले घेऊ.'
ट्रंप यांच्या फोन कॉलची व्हाईट हाऊसकडून माहिती देण्यात आली आहे. यावरुन असं कळतं की तो फोन नुसता औपचारीक नव्हता. दोन्ही देशांमध्ये 'टु बाय टु' डायलॉग करण्यासाठी कॅबिनेटमधील मोठे पदाधिकारी सहभागी होतील. अमेरिकेकडून सेक्रटरी ऑफ स्टेट आणि कॉमर्स तर भारताकडून देखील त्याच स्तराचे अधिकारी सहभागी होतील.
व्हाईट हाऊसने चीनचा आणि डोकलामचा कोणताही उल्लेख नाही केला पण इंडो पेसिफिक क्षेत्रात शांती आणि स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न करु असं म्हणत चीनवर अप्रत्यक्ष वक्तव्य केलं. ट्रंप यांचं हे पाऊल ओबामा सरकारमधील रणनितीचाच एक भाग आहे. अमेरिका या क्षेत्रात भारताला महत्त्व देतो. व्हाईट हाऊसचं वक्तव्य अशा वेळी आलं जेव्हा काही तासांपूर्वीच चीनसोबत असलेल्या व्यापाराची पुन्हा एकदा समीक्षा करणार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं.