मुंबई : कोरोनामुळे संकटात आलेल्या अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच भारताकडे मदत मागितली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने मदत न केल्यास धमकी देखील दिली होती. पण २४ तासातच त्यांचा सूर पूर्णपणे आता बदलला आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन बाबत पंतप्रधान मोदी यांनी मदत केली. ते खूप शानदार आहेत. असं ट्रम्प यांनी आता म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन बाबत बोलत असताना त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, 'आम्ही परदेशातून देखील औषध मागवत आहोत. याबाबत मी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत देखील चर्चा केली आहे. भारतातून देखील औषधं येत आहेत.'


डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, मी पंतप्रधान मोदींना विचारलं की, ते औषधं देणार का? ते शानदार आहेत. भारताने आपल्या देशासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधावर निर्यात बंदी केली होती. ती योग्य आहे. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी याआधी म्हटलं होतं की, भारत जर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन जर देत नाही तर त्यांच्यावर कारवाई करु. या वक्तव्यानंतर भारतात देखील वाद तयार झाला. विरोधीपक्ष सरकारला अमेरिकेच्या दबावात काम करु नका असं म्हणू लागली होते.


डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, 'लोकं यावर चर्चा करत आहेत. पण मला काही फरक नाही पडत. कारण इथे प्रश्न लोकांचा जीव वाचवण्याचा आहे.'


डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिलं होतं की, 'आमची प्राथमिकता आमच्या देशात भरपूर स्टॉक करण्यावर आहे. त्यानंतर ज्या देशांमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे त्या देशांना औषधं पाठवण्यात येईल.'


गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटलं होतं की, 'राज्यातील ३ कंपन्या अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधं पुरवतील.'