Donald Trup Aprtment : अमेरिकेतील राजकीय घडामोडीवर सर्वांचेच लक्ष लागले होते. अमेरिकतही सत्तापालट झाली आहे. अखेर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या  निवडणुकीत कमला हॅरिस यांचा पराभव झाला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासह चर्चा रंगली आहे ती अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारा व्यक्तीचे निवासस्थान म्हणजे व्हाईट हाऊस. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे कधीच व्हाईट हाऊस मध्ये राहत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या स्वत:च्या अपार्टमेंटमध्ये राहतात. डोनाल्ड ट्रम्प यांचे घर राजवाड्यापेक्षा कमी नाही. या घराच्या भिंती या सोन्याच्या आहेत. इतकचं नाही तर टॉयलेटही सोन्याचे आहे. ट्रम्प यांचे घर 24 कॅरेट सोन्याचे आणि संगमरवरी साहित्यांसह सजलेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिझनेसमधून राजकारणात एन्ट्री करणाऱ्या  ट्रम्प यांची लाईफस्टाईल खूपच अलिशान आहे. न्यूयॉर्क शहरातील एका 56 मजली टॉवरमध्ये बांधलेल्या पेंटहाउसमध्ये ट्रम्प यांचे स्वतःचे निवासस्थान आहे. ट्रम्प टॉवर्स नावाचा हा पेंटहाऊस सोन्याने मढवलेला आहे. याशिवाय  अटलांटिक समुद्राच्या काठावर ट्रम्प यांचा आलिशान बंगला आहे. ट्रम्प यांचा हा बंगला विंटर हाऊस म्हणूनही ओळखला जातो. फ्लोरिडामध्ये असलेल्या ट्रम्प यांच्या घराचं नाव आहे मार-ए-लागो.... चा' हा भव्य राजवाडा पाहून डोळे दिपतील.


डोळे दिपतील असा भव्य राजवाडा


हा राजवाडा 1927  मध्ये बांधण्यात आला होता.  1985 मध्ये डोनल्ड ट्रम्प यांनी 1 कोटी डॉलर्सला हा बंगला विकत घेतला होता.  आता या घराची किंमत 16 कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास 1166 कोटी एवढी आहे.जवळपास 12 एकरांवर हा राजवाडा पसरलाय.  त्यामध्ये 128 खोल्या आहेत.  तब्बल 20 हजार चौरस फुटांची बॉलरूम, 5 क्ले टेनिस कोर्ट  एक वॉटरफ्रन्ट पूल असा सगळा तामझाम आहे.


डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये का राहत नाहीत?


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीचे निवासस्थान म्हणजे व्हाईट हाऊस. येथूनच देशाचा कारभार चालतो. 6 मजली व्हाईट हाऊसमध्ये 132 खोल्या, 35 बाथरूम आहेत. यामध्ये स्टेट डायनिंग रूम, ओव्हल ऑफिस, मॅप रूम आणि इतर अनेक विशेष खोल्यांचा समावेश आहे. व्हाईट हाऊसमधील सजावट वेळोवेळी बदलत राहते.  मात्र, डोनाल्ड ट्रम्प कधीच व्हाईट हाऊसमध्ये राहत नाहीत. ट्रम्प हे स्वत:च्या खाजगी निवासस्थानात राहतात ट्रम्प यांचे न्यूयॉर्क ट्रम्प टॉवर आणि फ्लोरिडा मधील मार एलागो चा' राजवाडा दोन्ही अलिशान निवासस्थाने आहेत. ट्रम्प आपल्या खाजगी निवासस्थानातूनच देशाचा कारभार चालवतात. व्हाईट हाऊस हे अमेरिकन लोकशाहीचे प्रतीक आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असण्याव्यतिरिक्त हे अमेरिकन सरकारचे केंद्र देखील आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तसेच देशाचा कारभार पारदर्शकपणे होण्याकरिता राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसमध्ये निवास करणे अत्यंत महत्वाचे आहे. ट्रम्प कधीच व्हाईट हाऊसमधून कामकाज करत न करता स्वत:च्या खाजगी निवासस्थानतून देशाचा कारभार चालवत असल्याने त्यांना देशाच्या सुरक्षा एजन्सी मार्फत अनेकदा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यानंतर त्यांनी काही काळ व्हाईट हाऊसमधून काम केले अशीमाहिती समोर आली आहे.