वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील दोन भारतीय उद्योगपतींचा सन्मान केला. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत त्यांच्या छोट्या पण महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल यांना सन्मानित करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हाइट हाउस स्थित ओवल ऑफिसमध्ये काल ट्रम्प यांनी शरद ठक्कर आणि करण अरोडा या भारतीय व्यावसायिकांचा सन्मान केला. त्याचबरोबर इतर सात लघु उद्योग मालकांना सन्मानित करण्यात आले. 


शरद ठक्कर पॉलिमर टेक्नोलॉजीज चे अध्यक्ष आहेत. या कंपनीला या वर्षातील सर्वोत्कृष्ट लघु ऊर्जा कंपनी म्हणून गौरविण्यात आले. तर करण अरोडा हे नॅचरल व्हिटॅमिन लॅबचे निर्देशक असून या कंपनीला वर्षातील सर्वोत्कृष्ट लघु निर्यात कंपनी म्हणून नावाजले गेले.