नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रिचे अनेक किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील. परंतु, दोन्ही देशांच्या शीर्ष नेत्यांची ही मैत्री जपानमध्ये सुरू असलेल्या जी २० समिटमध्येही पाहायला मिळाली. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानमध्ये सुरू असलेलं जी २० शिखर संमलन सुरु होण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी कॉन्फरन्स रुममध्ये सर्व देशांचे नेते उपस्थित होते. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी संवाद साधला.


जी २० शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक ही भेट झाली. या दरम्यान ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या.  


या दरम्यान या दोन्ही नेत्यांची जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबतही बैठक पार पडली.