डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा दिसले मास्कमध्ये, फोटो व्हायरल
शनिवारी ट्रम्प मास्कमध्ये दिसल्यानंतर त्यांची पत्नी मेलानिया ट्र्म्प (Melania Trump)देखील मास्कमध्ये दिसल्या.
वॉशिंग्टन : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. तरी सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना काळात कधीही मास्क घातला नसल्याचं चित्र समोर आलं. मात्र ४ महिन्यांनंतर ११ जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी मास्क घलताना दिसले. दरम्यान सर्वच राष्ट्रांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत ट्र्प यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला.
जखमी आणि कोविड-१९ सैनिकांची प्रकृती जाणून घेण्यासाठी ट्रम्प यांनी वॉल्टर रीड नॅशनल मिलीटरी मेडिकल सेंटरला भेट दिली. वॉशिंग्टन येथील एका उपनगरीय भागात हे रुग्णालय आहे. रुग्णालयात असताना मास्क घालायला हवा, असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शनिवारी ट्रम्प मास्कमध्ये दिसल्यानंतर त्यांची पत्नी मेलानिया ट्र्म्प (Melania Trump)देखील मास्कमध्ये दिसल्या. मेलानिया ट्र्म्पयांनी एलिझाबेथ हाऊसला दिलेल्या भेटी दरम्यान मास्क घातला होता. तेथील एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.
सांगायचं झालं तर, अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, गेल्या २४ तासांमध्ये जवळपास ६० हजार नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ३,२६३,०७३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून १ लाख ३४ हजार ६५९ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.