ओरॅकल, वॉलमार्टकडून टिकटॉकची खरेदी, याकडे बारकाईने लक्ष - डोनाल्ड ट्रम्प
ओरॅकल आणि वॉलमार्टकडून टिकटॉकच्या खरेदीबाबत सुरु असलेल्या चर्चेवर व्हाईट हाऊस बारकाईने लक्ष ठेऊन आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
वॉशिंग्टन : ओरॅकल आणि वॉलमार्टकडून टिकटॉकच्या खरेदीबाबत सुरु असलेल्या चर्चेवर व्हाईट हाऊस बारकाईने लक्ष ठेऊन आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. टिकटॉकच्या खरेदीबाबत अमेरिका देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. विस्कॉन्सिन दौऱ्यापूर्वी त्यांनी ही माहिती दिली.
चीनला दणका देत भारताने टिकटॉकसह जवळपास १८९ चीनी अॅप्स्वर बंदी घातली. त्यानंतर अमेरिकेनेही चीनला जोरदार दणका देत टिकटॉकवर बंदी घातली. त्यामुळे टिकटॉक अॅप्स अडचणीत आले. आता या टिकटॉकची विक्री करण्यात येत आहे. त्यासाठी ओरॅकल आणि वॉलमार्टकडून टिकटॉकच्या खरेदीबाबत चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील २४ ते ३६ तासांत अमेरिकेत टिकटॉकच्या भवितव्याबाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, मालकीच्या समस्येवर लक्ष देण्यासाठी बाईटडन्सने अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंजवर ग्लोबल टिकटॉकची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर करण्याची योजना आखली आहे, या प्रकरणाशी परिचित लोकांच्या मते. ओरॅकलकडे कमी भागभांडवलदेखील असेल, जो नवीन ग्लोबल टिकटोकच्या २० टक्क्यांपेक्षा कमी असेल, असे सांगण्यात येत आहे. दोन टक्के लोकांच्याच्या मते वॉलमार्टदेखील भाग घेईल, अशी शक्यता आहे. या व्यवहारावर बारीक लक्ष असेल असे डोनाल्ड यांनी म्हटले आहे.
कोरोना संकट । फ्रान्समध्ये कर्मचारी संपावर
फ्रान्समध्ये कोरोनाची तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांतील शेकडो कर्मचारी संपावर गेलेत. पगारवाढीसाठी या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय. त्यामुळे अनेक शहरांतील कोरोनाच्या तपासण्या रखडल्यात. अनेक नागरिक तपासणीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे कोरनाचा धोका आणखीन वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोविड-१९चा फैलाव । ब्रिटनमध्ये निर्बंध
कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेत ब्रिटनमधील काही भागात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. घरगुती कार्यक्रमांवरही निर्बंध लादण्यात आलेत. तसंच पबही बंद करण्यात आलेत. आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी ही घोषणा केली. न्यूकॅसलमध्ये काही रहिवाशांनी या निर्बंधांचं स्वागत केले आहे.
स्पेन सरकारची चिंता वाढवली
स्पेनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने सरकारची चिंता वाढवली आहे. माद्रीदमध्येही कोरोनाचं संक्रमण झपाट्यानं होत आहे. सर्वाधिक घनतेच्या भागात कोरोनानं शिरकाव केल्यानं सरकार पुन्हा लॉकडाऊनच्या विचारात आहे.