नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्याप्रति अधिक उत्साही दिसत आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे. भारतात जाणे हे त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्क झुकरबर्गने नुकतेच सांगितले होते की फेसबुकवर डोनाल्ड ट्रम्प एक नंबर तर भारताचे पंतप्रधान मोदी नंबर दोन वर आहेत. मी दोन आठवड्यांसाठी भारतात चाललो आहे. यासाठी उत्साही आहे असे ट्विटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. 


तथ्य पाहायला गेलो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फेसबुक फॉलोअर्स हे ४४ मिलियनहून अधिक आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांचे २७ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे कोणत्या माहितीच्या आधारे ट्रम्प यांनी हे ट्विट केले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 




दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येतायत याचा मला खूप आनंद आहे. भारत आपल्या सन्मानित पाहुण्यांचे खूप छान स्वागत करेल. हा दौरा खूप विेशेष असेल आणि भारत-अमेरिकेची मैत्री येणाऱ्या काळात अधिक दृढ करणारा असेल, असे मोदी म्हणाले.