अमेरिकेची पुन्हा चंद्रावर स्वारी, नव्या अवकाश धोरणाला मान्यता

नील आर्मस्ट्राँगनंतर आता पुन्हा एकदा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज होणार आहेत.
वॉशिंग्टन : नील आर्मस्ट्राँगनंतर आता पुन्हा एकदा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज होणार आहेत.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या नव्या अवकाश धोरणाला मान्यता दिली आहे. इतकंच नव्हे, तर मंगळावरही अंतराळवीर उतरवण्याचा अमेरिकेचा मानस आहे.
१९७२ साली अपोलो यानातून नासाच्या अंतराळवीरांचं पथक चंद्रावर उतरलं होतं. ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे आता पुन्हा एकदा चंद्र आणि मंगळावर अंतराळफेरी करणं नासाला शक्य होणार आहे.
अंतराळ संशोधनामध्ये अमेरिकेला पुन्हा एकदा मोठं स्थान मिळवून देण्यासाठी या धोरणाची मदत होणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय.