मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी याठिकाणी ह्यूस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' या मेगा शोला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात हजारो भारतीय सहभागी होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ होण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचं महत्त्व अधिक आहे. या कार्यक्रमात मोदींच्या भाषणाशिवाय भारत आणि अमेरिकेचे संबंध दर्शवणारा सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे. टेक्सास इंडिया फोरमद्वारे पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 
 
दक्षिण पश्चिम अमेरिकेत मैत्री दाखवण्यासाठी एकमेकांना हाऊडी म्हणण्याची प्रथा आहे. हाऊडीचं 'हाऊ डू यू डू' असं संक्षिप्त रुप आहे. या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत ५० हजार लोकांनी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे आठ हजार लोकांची नावं प्रतीक्षा यादीत आहे. पोप यांच्यानंतर अमेरिकेत एखाद्या परदेशी नेत्याचा हा सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे.