आता तरी सुधारा अन्यथा... ट्रम्पचा पाकिस्तानला इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला `नोटीस`वर ठेवल्याचं व्हाईट हाऊसमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलंय.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला 'नोटीस'वर ठेवल्याचं व्हाईट हाऊसमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलंय. अमेरिकेनं आतापर्यंत बराच काळ धीर धरलाय.
हक्कानी नेटवर्कसह त्या देशात असलेल्या अतिरेकी संघटना अद्याप मोकाटच आहेत. त्यांच्यावर अंकुश आणला गेला नाही, तर पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका मागेपुढे पाहणार नाही, असं पोलिटिको या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत हा अधिकारी म्हणाला.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनीही पाकिस्तानला इशारा दिलाय. अतिरेकी संघटनांबाबत पाकिस्ताननं आपलं धोरण बदलण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.