वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माजी सल्लागारांना ट्विटरने जोरदार दणका दिला आहे. रोजर स्टोन असे या सल्लागारांचे नाव असून, ट्विटरने त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. एका खासगी न्यूज चॅनलच्या पत्रकारांना धमकावल्या प्रकरणी ट्विटरने ही कारवाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टोन हे रिपब्लिकन पार्टीचे सदस्य आणि प्रदीर्घ काळापासून ट्रम्प यांचे मित्र राहिले आहेत. शुक्रवारी रात्री प्रसारीत केलेल्या एका रिपर्टवर नाराज होऊन स्टोन यांनी अत्यंत तीव्र शब्दांत पत्रकारांवर टीका केली. तसेच, त्यांच्यावर टीकाही केली.


स्टोन यांनी न्यायॉर्क टाईम्से स्तंभकार चार्ल्स ब्लो यांच्यासह जेक टॅपर, बिल क्रिस्टल, कार्ल बर्नस्टीन, डॉन लेमन आणि एना नावरो तसेच अनेक चॅनल अॅंकरवर तसेच, संयोजकांवर हल्ला चढवला.


स्टोन यांनी लेमन यांच्यावर टीका करताना ट्विटरवर लिहीले की, अल्पबुध्दीचा आणि अहंकारी पार्टीबॉय खोटे बोलत आहे. खोट्या बातम्या. स्टोन यांच्या या ट्विटमुळे ते टीकेचे धनी झाले आहेत. ट्विटरने स्टोन यांच्यावर कारवाई करत ठरावीक मुदतीपर्यंत त्यांचे ट्विटर खाते बंद केले आहे. महत्त्वाचे असे की, यापूर्वीही स्टोन यांच्यावर अशी कारवाई झाली आहे.