दारूच्या नशेत आधी कार ठोकली, पकडल्यानंतर पोलिसांनाच दिली सेक्सची ऑफर
Drunk girl | मद्यधुंद तरुणीला कार चालवणं महागात पडलंय. पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर तिने तपास अधिकाऱ्यालाच शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली.
मुंबई : Drunk girl offer sexual acts to police officer | दारू पिऊन कार चालवणे हा गुन्हा आहे. महामार्ग आणि रस्त्यांवर मोठ्या अक्षरात याबाबतचे बोर्ड लिहलेले असतात. मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना पकडले गेल्यास केवळ दंडच नाही. तर तुरुंगवासही होऊ शकतो.
असे असतानाही अनेक लोक दारूच्या नशेत वाहन चालवतात. इतर लोकांच्या जीवाची पर्वा न करता वाहन चालवताना आढळतात. अमेरिकेतील टेक्सासमध्ये दारूच्या नशेत कार चालवताना एका तरुणीला पकडण्यात आल्यावर तिने आपल्या सोडून देण्याच्या बदल्यात एका पोलिसाला सेक्सची ऑफरही दिली.
टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका तरुणीची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर चढली आणि नंतर ट्रॅफिक नियंत्रक खांबावर आदळली.
पोलिस येण्यापूर्वीच आरोपी तरुणी तेथून पळून गेली होती. पोलिसांनी आरोपी 21 वर्षीय डल्से ऑर्टिजला शोधून काढले. ऑर्टिज ही दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. तीच गाडी चालवत असल्याचे दिसून आले.
स्वतःची सोडवणूक करण्यासाठी विचित्र ऑफर
आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना ऑर्टिजने तपास अधिकाऱ्याला लाच देऊन सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लाच घेण्याची ऑफर फेटाळून लावली. त्यानंतर आरोपी तरुणीने शरीरसंबंध ठेवण्याचा प्रस्तावही दिला. तपास अधिकारी कॉन्स्टेबल हरमनने फेसबुकवर पोस्ट लिहून संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.