पृथ्वीवर चंद्र उतरवण्याच्या तयारीत दुबई ! असा असू शकतो दिमाखदार नजारा
Dubai Artificial Moon: तुम्ही पृथ्वीवरुन नेहमी आकाशात चंद्र पाहत असता. आता तर पृथ्वीवरच चंद्र पाहायला मिळाला तर...कशी वाटतेय ही कल्पना. हो, ही कल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे. कारण दुबईत पृथ्वीवर चंद्र उतरविण्याची तयारी सुरु झालेय. पण हा कृत्रिम चंद्र असणार आहे.
Artificial moon proposed in Dubai by Canadian architect : आपण अनेकवेळा चंद्राचे गाणे गुणगणत असतो. चंद्र आहे साक्षीला, असे आपण अनेक वेळा म्हटलं आहे. मात्र, आता खरंच पृथ्वीवर चंद्र उतरविण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आपण म्हणून शकतो चंद्र आहे साक्षीला ! चंद्र मोहिमेनंतर प्रत्यक्षात माणूस चंद्रावर उतरला. आता तर त्यापुढे जाऊन चंद्रावर घर घेण्याची स्वप्न माणूस पाहू लागला आहे. आता जर चंद्रच पृथ्वीवर अवतरत असेल तर... हो, हे शक्य आहे. कारण दुबईत तशी तयारी सुरु झालेय. पण हा कृत्रिम चंद्र असणार आहे.
चंद्र प्रत्येकाला भुरळ घालतो. नेहमीच आपल्या आकर्षणाचा विषय हा चंद्र राहिलेला आहे. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, असे गाणे आपण लहानपणी ऐकले असेल. आपली आई अंगाई गाताना या गाण्याची आठवण येते. तसेच पृथ्वीला आपण आई असे संबंधतो. त्यामुळे चंद्राला मामा म्हणतात. चंद्र हा कवींचा आवडता विषय राहिला आहे. आता हाच चंद्र पृथ्वीर अवतरला तर... आता दुबईत चंद्र उतरण्याची तयारी सुरु आहे.
माणूस चंद्रावर उतला. त्यामुळे चंद्रावर जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. ऑक्सिजन आणि पाणी यासारख्या समस्यांमुळे मानवाला चंद्रावर राहणे शक्य होणार नाही, परंतु मानवाला नेहमीच चंद्रावर राहण्याची इच्छा होती. चंद्रावर जाणे हीदेखील सोपी गोष्ट नाही, त्यामुळे दुबईने आता चंद्रच जमिनीवर उतरण्याची तयारी केली आहे.
दुबईत तारे नाही तर चंद्र जमिनीवर...
'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दुबई पृथ्वीवर चंद्र आणण्याच्या तयारीत आहे. हा खरा चंद्र नसून कृत्रिम चंद्र रिसॉर्ट प्रकल्प आहे. म्हणजेच हा चंद्र कृत्रिम असला तरी तो खऱ्या चंद्रासारखा वाटेल, असा दावा करणाऱ्यात आला आहे. म्हणजेच हा चंद्र कृत्रिम असला तरी तो खऱ्या चंद्रासारखा वाटेल, असा दावा करणाऱ्यात आला आहे. हा चंद्राचा प्रकल्प बनवण्याची जबाबदारी कॅनडाच्या आर्किटेक्ट आणि कंपनीला देण्यात आली आहे. सुमारे पाच अब्ज डॉलर्स खर्चाच्या या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे. पण दुबईतील श्रीमंत लोकांकडे पैशाची काय कमतरता नाहीच, त्यामुळे या कामात कुठेही अडचण येणार नाही. कॅनेडियन उद्योजक मायकेल हेंडरसन 900 फूट चंद्राच्या मॉडेलला आकार देणार आहेत.
चंद्राची खास होणार शटल सवारी
चंद्राच्या आकाराच्या या मेगा-रिसॉर्टमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधांसह एक नाईट क्लब आणि वेलनेस सेंटर देखील बांधले जाईल. मून रिसॉर्ट दरवर्षी लाखो परदेशी पाहुण्यांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी रिसॉर्टच्या इमारतीला मोठा आकार दिला जाणार आहे. या रिसॉर्टमध्ये, पाहुणे मून शटलवर स्वार होऊन दृश्यांचा आनंद घेऊ शकतील, अशी व्यवस्था असणार आहे. हे मून शटल लोकांना रिसॉर्टच्या आजूबाजूच्या ट्रॅकवर हलवण्यास सक्षम असेल. त्याचा ट्रॅक रिसॉर्टच्या संरचनेच्या मध्यभागी गोलाकार आकारात बनविला जाईल.
दुबईचे खास वैशिष्ट्य
दुबईत हे मून रिसॉर्ट 100 फूट उंच इमारतीच्या वर बांधले जाणार आहे. दुबई जगातील सर्वात उंच इमारत आणि इतर स्थापत्य चमत्कारांसाठी ओळखले जाते. बुर्ज खलिफासारख्या उंच इमारती वर्षानुवर्षे लोकांना भुरळ घालत आहेत. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या चंद्रात बसून लोकांच्या इच्छा पूर्ण होतील, ज्याचा यापूर्वी कधीही विचार केला नव्हता. ते स्वप्नवत सत्य इथंच साकार होणार आहे.