तेहरान : इराण-इराक सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. हा भूकंप इतका मोठा होता की, त्यामुळे तब्बल १२९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


या भूकंपामुळे जवळपास ३०० नागरिक जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे.


द इंडिपेंडेंटने दिलेल्या वृत्तानुसार, इरानमधील जवळपास १४ राज्यांत भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू इरानमधील हलाबजा शहरातील दक्षिण-पश्चिम भागात होता.



हा भूकंप आंतरराष्ट्रीय वेळेनुसार १८.१८ (सायंकाळी सहा वाजून १८ मिनिट) वाजता आला. इराकमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता इतकी होती की बगदादपर्यंत झटके ऐकण्यात आल्याचं बोललं जात आहे.