Elderly Woman Rs 9 Crore Treasure: युरोपमधील रोमानिया देशातील एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या म्हाताऱ्या महिलेने मागील अनेक दशकांपासून न कळत एक मैल्यवान गोष्ट जपून ठेवल्याचं उघड झालं आहे. मागील अनेक वर्षांपासून दरवाजा आपटू नये म्हणून जो दगड ही महिला वापरत होती तो मैल्यवान असल्याचं समोर आलं आहे. हा दगड साडेतीन किलोंचा आहे. हा खडक 'अंबर नगेट' म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिंकासारख्या पदार्थापासून बनलेला खडकासारखा प्रकार असल्याचं समोर आलं आहे. या खडकाची किंमत आजच्या घडीला 9 कोटी रुपये इतकी आहे. 


आतापर्यंत सापडलेला अशाप्रकारचा सर्वात मोठा खडक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंतच्या मानवी इतिहासामध्ये सापडलेला हा अशाप्रकारचा सर्वाधिक वजनाचा खडक आहे. या खडकासारखा दिसणारा मैल्यवान दगड एका नदीपात्रात या आजीबाईंना सापडला होता. एल पैस (El Pais) या प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहिुतीनुसार, प्रोव्हेन्शीअल म्युझिअम ऑफ बुझौचे निर्देश डॅनिअल कोस्टेच यांनी हा खडक मौल्यवान असल्याचं ओळखलं आणि त्याची खरी किंमत सांगितली आहे. पोलंडमधील कारको येथील म्युझिअम ऑफ हिस्ट्री येथे हा खडक पाठवण्यात आला असून आता हा खडक 3.85 कोटी ते 7 कोटी वर्षांपूर्वीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


नातेवाईकाला समजलं हा खडक सामान्य नाही


दुर्देवाने ज्या आजी हा खडक दरवाजा रोखून धरण्यासाठी वापरायच्या आणि ज्यांना हा नदीत सापडला त्यांचा मृत्यू 1991 साली झाला आहे. या आजींच्या मृत्यूनंतर हा दगड त्यांच्या एका नातेवाईकाकडे होता. त्याला हा सामान्य दगड नाही हे समजलं आणि त्याने हा खडक रोमानियाच्या सरकारला विकण्याचा निर्णय घेतला. तज्ज्ञांनी हा खडक मौल्यवान असल्याचं निश्चित केलं आहे. "वैज्ञानिक आणि संग्रहालयाच्या दृष्टीकोनातून हा शोध फार महत्त्वाचा आहे," असं डॅनिअल कोस्टेच यांनी म्हटलं आहे. या खडकाचं मूल्य पाहिल्यास सरकारच हा खडक या आजींच्या नातेवाईकाकडून विकत घेण्याची दाट शक्यता आहे. आता यासंदर्भात पुढील वाटाघाटी होतील असं सांगितलं जात आहे.



चोर या दगडाच्या समोरुन गेले तरी...


या महिलेच्या नातेवाईकांनी मध्यंतरी घरी एकदा चोरी झाली तेव्हा चोरांनी सोन्याचे काही दागिने चोरुन नेले होते. ते लोक या दगडासमोरुन गेले तरी त्यांनी तो चोरला नाही. रोमानियामधील बुझौ प्रांतामध्ये अशाप्रकारे यापूर्वी अनेकदा मौल्यवान खडक सापडले आहेत. या भागात असे अनेक अति पुरातन खडक असल्याचं सांगितलं जातं.