नवी दिल्ली : भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी देश पाकिस्तानमध्ये 25 जुलैला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत 3459 उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत. दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाजिफ सईदने देखील या निवडणुकीत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. ज्य़ामध्ये त्याचा जावई आणि मुलगा यांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानच्या निवडणुकीत दहशतवादी संघटनांचे एकूण 460 उमेदवार रिंगणात आहेत. 4 राज्यांच्या 577 जागांसाठी 8396 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताप्रमाणेच पाकिस्तानचे देखील 2 सदन असतात. पाकिस्तानच्या संसदेला मजलिस-ए-शूरा म्हटलं जातं. लोकसभेला कौमी अॅसेम्ब्ली म्हटलं जातं तर राज्यसभेला आइवान-ए बाला म्हटलं जातं. भारतामध्ये राष्ट्रपती संसदेचा भाग नसतात पण पाकिस्तानच्या संसदेत दोन्ही सदनात राष्ट्रपतींचा सहभाग असतो.


कशी होते निवडणूक 


- भारताच्या राज्यसभेप्रमाणेच पाकिस्तानी सीनेटच्या सदस्यांना राज्यातील सदस्य निवडतात. तर लोकसभेतील सदस्यांची निवड निवडणूक घेऊनच होते. 25 जुलैला ही निवडणूक होणार आहे.


- पाकिस्तानचे लोकसभेतील सदस्यांची संख्या 342 आहे. पण फक्त 272 सदस्य हे प्रत्यक्ष मतदानातून निवडले जातात. 70 उमेदवारांसाठी निवडणूक नाही होत.


70 सदस्य कसे निवडतात


- या 70 जागांसाठी 60 जागा महिलांसाठी आरक्षित असतात. 10 जागा पाकिस्तानच्या पारंपरिक आणि धार्मिक अल्‍पसंख्‍यक समुदायासाठी आरक्षित असतात.


- ज्या पक्षाकडे सर्वाधिक जागा आहेत. त्यांचे तेवढे उमेदवार आरक्षण असलेल्य़ा जागांवर खासदार बनू शकतात.