नवी दिल्ली : सोशल मीडियात कधी एखादा फोटो व्हायरल होतो तर कधी व्हिडिओ. आता अशाच प्रकारे एका हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हत्ती बसवर हल्ला करत असल्याचं पहायला मिळत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यावेळी हत्तीने बसवर हल्ला केला त्यावेळी बसमध्ये चालक उपस्थित होता. हा बस चालक हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे.


हा व्हिडिओ चीनमधील युन्नान येथील असल्याचं बोललं जात आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून हत्तीचा उद्रेक पहायला मिळत आहे. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. 


चीनमधील एका न्यूज चॅनलद्वारे युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत पहायला मिळत आहे की, एका हत्तीने बसवर अचानक हल्ला केला. सर्वातआधी हत्तीने आपल्या डोक्याने बसची समोरील काच फोडण्याचा प्रयत्न केला.


त्यानंतर हत्तीने आपल्या सोंड आणि डोक्याच्या सहाय्याने बसला मागे ढकलण्यास सुरुवात करतो. मात्र, उतार असल्याने बस पुन्हा पुढे येते. मग हत्ती पुन्हा बसला मागे ढकलतो.



त्यानंतर हा हत्ती आणखीन एका ट्रकला धक्का मारत पलटी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळत आहे.