एलॉन मस्क (elon musk) यांनी ट्विटरची (twitter) सुत्रे हातात घेऊन आठवडाही उलटला नाही पण त्यांच्या निर्णयाने सगळ्या जगाला टेंशन दिलय. एलॉन मस्क यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांमुळे ट्विटर युजर्स चिंतेत आलेत. मस्क एकामागून एक असे निर्णय घेत आहेत, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. एलॉन मस्क यांनी  ट्विटरची मालकी घेताच माजी व्यवस्थापकीय संचालक पराग अग्रवाल (parag agrawal) यांच्यासह सर्व बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर त्यांनी ट्विटरमधून कर्मचाऱ्याची कपात केलीय. ब्लू टिकसाठी (blue tick) पैसे भरावे लागणार असल्याचा निर्णयही मस्क यांनी जाहीर केलाय. त्यानंतर एलॉन मस्क यांनी पॅरडी अकाऊंटवर (Parody Twitter) बंदी जाहीर केलीय. (Elon Musk bans on Parody Twitter account)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले एलॉन मस्क?


एलॉन मस्क यांनी आता त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक नवीन घोषणा केली आहे. "जर कोणी पॅरडी अकाऊंट तयार केले तर त्याला त्याचे अकाऊंट पॅरडी असल्याचे सांगावे लागेल. तुमच्या प्रोफाइलवर तुम्हाला पॅरडी अकाऊंट असे लिहावं लागणार आहे. असे न केल्यास ते अकाऊंट कायमचे बंद केले जाईल," असे मस्क (elon musk) यांनी म्हटले आहे.



"आधी, आम्ही अकाऊंट बंद निलंबित करण्यापूर्वी इशारा द्यायचो. पण आता आम्ही मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशन सुरू करत आहोत. त्यामुळे आता  कोणताही इशारा देणार नाही," असे मस्क यांनी म्हटलं आहे. याशिवाय जर कोणी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर नाव बदलले तर त्याची ब्लू टिक तात्पुरती काढून टाकली जाईल, असेही मस्क म्हणाले.