Elon Musk, Mr. Tweet: ट्विटरचे (Twitter) मालकी हक्क मिळाल्यापासून ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) अनेक नवनवीन बदल घडवून आणतायेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर अनेक प्रयोग करण्यात त्यांना यश देखील मिळालंय. इलॉन मस्क सध्या ट्विटरवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतं. अशातच आता इलॉन मस्क यांनी बारसं घातल्याचं पहायला मिळतंय. (Elon Musk become mr tweet on twitter marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा स्वतःचं नाव (Elon Musk Change Name) बदललं आहे. खरं तर मस्क यांनी प्रत्यक्षात त्याचं नाव बदललं नाही तर त्यांनी आपल्या ट्विटरच्या नावात मोठा (Twitter Name) बदल केला आहे. ट्विटरवर मस्क यांनी नाव बदलून Mr. Tweet असं नाव ठेवलं आहे. त्यानंतर त्यांनी एक ट्विट देखील केलंय.


मी माझं नाव बदलून Mr. ट्विट (Elon Musk Tweet) केलंय आणि आता ट्विटर मला माझं नाव बदलू देणार नाही, असं गंमत म्हणून त्यांनी म्हटलंय. त्यापुढे त्यांनी (Elon Musk become MR. tweet) खदाखदा हसण्याची स्माईल देखील शेअर केलीये. 



इलॉन मस्क यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये, ट्विटरवर त्याचं नाव बदलून लॉर्ड एज केलं होतं. त्यानंतर त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं. मात्र, आता ते ट्विटरचे मालक आहेत. त्यामुळे यंदा ट्रोल होण्याचा प्रश्न जास्त उद्भवणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


आणखी वाचा - नाव हाय, पैसा हाय, इज्जत हाय... तरीही Elon Musk का म्हणतायेत "मी मरण यातना सोसतोय"


दरम्यान, लहान वयात नाव, पैसा, इज्जत सर्वकाही कमवलेल्या मस्क यांची ख्याती गावगाड्यापर्यंत पसरली आहे. त्यांच्या ट्विटची (Elon Musk Tweet) सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसते. काही दिवसांपूर्वी कोविड लसीच्या दुसऱ्या बूस्टर डोसबाबत (Covid-19 Booster Dose) त्यांचा अनुभव शेअर करताना ट्वीट केलं होतं, त्याची चर्चा होताना दिसत होती.