मुंबई : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) आता नवीन व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायाबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरून नागरीकांना दिली आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायात (Elon Musk perfume salesman) उतरण्याच्या काही तासातच ते मालामाल झाले आहेत.त्यामुळे त्यांच्या या व्यवसायाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. दरम्यान त्यांचा हा नवीन व्यवसाय कोणता आहे? व या व्यवसायातून त्यांनी काही तासात किती कोटी कमवले आहेत, ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सनंतर (SpaceX) एल़ॉन मस्क आता परफ्युम (Elon Musk perfume salesman) व्यवसायात उतरले आहेत. त्यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आता परफ्युम विकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान मस्क यांनी ट्विटर अकाऊंटवरून या व्यवसायाची माहिती दिली आहे. 


एल़ॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बर्ट हेअर (Burnt Hai) नावाचा एक परफ्युम ब्राँड लाँच केला आहे. यासह त्यांनी हा जगातील सर्वोत्तम सुगंधीत परफ्युम असल्याचा दावा केला आहे. तसेच द बोरींग कंपनीवर (The Boring Company) एक वेगळे बाय नाऊ (Buy Now) पेज देखील दिसत आहे.


एल़ॉन मस्क (Elon Musk) यांनी सांगितले आहे की, हा परफ्यूम Omnigender असेल, म्हणजेच पुरुष, महिला आणि इतर सर्व लिंगांचे लोक देखील वापर करू शकणार आहे. या परफ्यूमची खास गोष्ट सागंताना मस्क म्हणाले की, 'हा विरुद्ध इच्छांचा हा परफ्यूम आहे'. हा एक असा परफ्यूम आहे, जो तुम्हाला गर्दीतून वेगळा बनवतो, तुम्ही विमानतळावरून जात असतानाही लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकता, असे त्यांनी म्हटले आहे.


किंमत किती?
दरम्यान एलॉन मस्कच्या (Elon Musk) कंपनीने हा परफ्युम (Elon Musk perfume salesman) लाँच करताच, त्याच्या साधारण 10 हजार कुप्या विकल्याचा दावा केला आहे. या परफ्युमच्या एका कुपीची किंमत 100 डॉलर (म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 8400 रुपये) आहे. यासह शिपिंग शुल्क अतिरिक्त लागणार आहे. नागरीकांना हा परफ्यूम क्रिप्टोकरन्सीद्वारेही खरेदी करता येणार आहे. यासाठी शिपिंग शुल्क 3,000 रुपये असेल.


दरम्यान एलॉन मस्क यांनी सप्टेंबरमध्ये परफ्यूम मार्केटमध्ये (Elon Musk perfume salesman) प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यावेळीस लोकांना वाटले की तो विनोद आहे. मात्र आज प्रत्यक्षात ते या व्यवसायात उतरले आहेत. तसेच या व्यवसायातून ते चांगली कमाई करत आहेत.