इजराइल हमास युद्धात elon musk ची उडी;, घेतला `हा` मोठा निर्णय!
Israel Hamas War: काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या (Elon Musk) वतीने करण्यात आलं आहे.
Elon Musk On Israel Hamas war : इस्रायल-हमास युद्धाला (Israel Hamas war) आता सात दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, हमासने इस्रायलला इशारा दिलाय. इस्रायलला (Israel News) नष्ट करण्यासाठी 15 कलमी योजना तयार करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. ऑपरेशन अल अक्सा नंतर हमासने (Hamas) शुक्रवारी अल अक्सा ऑपरेशनची घोषणा केली आहे. त्यामुळे आता इस्त्रायल देखील त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी प्लॅन रचला आहे. अशातच आता एक्स प्लॅटफॉर्मचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी देखील हमासवर हल्लाबोल केला आहे.
हमासच्या इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील हमासच्या संबंधी शेकडो अकाऊंट बॅन केले आहेत. दहशतवादी संघटनांना एक्स प्लॅटफॉर्मवर कोणतीही जागा नाही, असं इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी एक्सने काही भारतीयांच्या अकाऊंटला देखील ताळ ठोकलं होतं. अशातच आता हमासच्या नाड्या दाबण्याचं काम इलॉन मस्कच्या वतीने करण्यात आलं आहे.
युरोपियन युनियन सोबतच जगभरातील इतर देशांच्या कायद्यांचे पालन आम्ही करत आहोत असंही सीईओ लिंडा याकारिनो यांनी स्पष्ट केलंय. युएनने दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली होती. नव्याने लागू केलेल्या EU च्या डिजिटल सर्व्हिसेस ऍक्ट (DSA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. ऑनलाइन प्लॅटफॉर्मने बेकायदेशीर कंटेन्ट काढून टाकण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा असा धोका दूर करण्यासाठी अधिक सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं मत मांडण्यात आलं होतं.
आणखी वाचा - Israel-Palestine War : इस्रायलसमोर बेचिराख होणार हमास; विनाशकारी फॉस्फरस बॉम्ब असतो कसा?
गाझामध्ये इस्रायलकडून झालेल्या लहान मुलांचा आणि महिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आज आम्ही असा बदला घेऊ की, इस्रायलने स्वप्नातही विचार केला नसेल, असं हमासकडून सांगण्यास आलंय. त्यामुळे आता अमेरिका आणि इस्त्रायलने हमासला उत्तर देण्यासाठी सोशल मीडियावरून नवा तोडगा काढला आहे.