Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येणाऱ्या एलन मस्‍क (Elon Musk) यांच्यााविषयी सांगावं तितकं कमीच. मस्क यांच्या वैवाहिक आयुष्यापासून त्यांच्या खासगी आयुष्यापर्यंत बरीच माहिती आतापर्यंत जगासमोर उघड झाली आहे. फक्त इतकंच नव्हे, तर मस्क यांच्या संपत्तीचा आकडाही सर्वांसमोर आला. पण, आता एक अशी चर्चा पाहायला मिळतेय जिथे एलन मस्क यांच्या आईनंही संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सुरु असणाऱ्या चर्चांनुसार एलन मस्क यांच्या आई, मेयी मस्‍क (Maye Musk) यांच्यावर चक्क गॅरेजमध्ये झोपण्याची वेळ आली होती. एलन यांची आई, मेयी 74 वर्षांची आहे. त्या एक मॉडेल आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. (Elon Musk mother sleeps in the garage know why )


(Elon Musk Mother texas) एका मुलाखतीदरम्यान त्यांनीच खुलासा केला होता, की जेव्हा त्या एलन यांची भेट घेण्यासाठी (texas) टेक्सासला जात होत्या, तेव्हा त्यांना गॅरेजमध्ये झोपावं लागत होतं. स्पेसएक्सचं मुख्यालयही तिथंच असल्याचं सांगण्यात येत आहे.


आपल्या मुलाकडे किती संपत्ती आहे, याबाबत मेयी यांना काहीच आकर्षण नाही. गॅरेजमध्ये झोपावं लागतं कारण, रॉकेट साईटजवळ सहाजिकच आलिशान घराची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही, ही वस्तुस्थितीही त्यांनी यावेळी मांडली. तब्बल 229 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती असणाऱ्या एलन मस्क यांच्या आईचा हा साधेपणा पाहून अनेकजण थक्क झाले. 



तुम्हाला माहितीये का? 
असं म्हटलं जातं की एलन यांनी स्वत:च ही गोष्ट स्वीकारली आहे की त्यांच्याकडे स्वत:चं घर नाही. ते मित्रांच्याच घरी थांबतात. त्यांनी बोका चिका इथं एक घर 50 हजार डॉलर्स रुपये इतक्या किमतीला भाड्यानं घेतलं होतं.