Elon Musk Spacex Mars Mission: एकीकडे भारत चांद्रयान 3 मोहिमेच्या माध्यामातून चंद्रावर जीवसृष्टीचा शोध घेत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे सापडल्याने या मोहिमेला मोठा यश आले आहे. अशातच एलॉन मस्क यांच्या डोक्यात भलतचं काही तरी सुरु आहे. इलॉन मस्क  Spacex Mars Mission च्या माध्यमातून तब्बल 10 लाखा लोकांना मंगळ ग्रहावर पाठवण्याची तयारी करत आहेत. Elon Musk यांचे हे मिशन अत्यंत भयानक आणि धोकादायक मानले जात आहे. 


मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे एलॉन मस्क यांचे स्वप्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी मंगळावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे  स्वप्न पाहिले आहे. त्याअनुषंगाने या मोहिवर काम सुरु आहेय  SpaceX चे CEO एलॉन मस्क यांनी 2020 मध्येच मंगळ ग्रहावर मानवी वस्ती तयार करण्याची घोषणा केली होती. 2050 पर्यंत 10 लाख लोकांना मंगळावर पाठवण्‍याचे त्यांचे टार्गेट आहे. 


NASA च्या मदतीने Spacex Mars Mission


इलॉन मस्क यांनी NASA च्या मदतीने Spacex Mars Mission हाती घेतले आहे. NASA च्या मदतीने Spacex रॉकेटच्या मदतीने मानवाला मंगळग्रहावर पोहचवले जाणार आहे. SpaceX स्टारशिपने मंगळ ग्रहावर जाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे वाहन तयार केले आहे.  


मंगळ ग्रहावर स्वावलंबी शहर उभारणार 


मंगळ  ग्रहावर स्वावलंबी शहर उभारले जाणार आहे. यासाठी 10 दशलक्ष टन मालाची गरज पडू शकते. याचा खर्च अंदाजे 100 अब्ज डॉलर इतका असू शखतो असा अंदाज मस्क यांनी व्यक्त केला आहे.


मंगळ ग्रहावर माणूस जिवंत राहू शकतो का?


मंगळ ग्रहावर जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेतला जात आहे. मात्र, याबाबत कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. अशातच मंगळ ग्रहावर माणूस जिवंत राहू शकतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळ ग्रह पृथ्वीपासून 34 दशलक्ष मैल दूर आहे. यामुळे मंगळ ग्रहावर जाणे आणि तेथून पृथ्वीवर परत येणे अत्यंत आव्हानात्मक आहे. सोलर फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शन्स (CMEs) चे रेडिएशन या धोकादायक किरणोत्सर्गामुळे येथे मानव राहणे अत्यंत धोकादायक आणि जीवघेणे आहे. यामुळे रेडिएशनपासून मानवाचा बचावर करणारे तंत्रज्ञान विकसीत करणे हा या मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सध्या मंगळ ग्रहावर तीन रोव्हर संशोधन करत आहेत. जे मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. यामध्ये नासाच्या पर्सव्हरेन्स अँड क्युरिऑसिटी रोव्हर्स आणि चीनच्या झुरोंग रोव्हरचा समावेश आहे.