Viral Video: आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात ऑफिसचं प्रेशर दिवसेंदिवस वाढत जात आहे. या ऑफिस प्रेशरचा आपल्या कामावर आणि आरोग्यावर परिणाम होतोय. कमी वयात अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. यामुळे ऑफिस कामावरही याचा परिणाम होतो आणि याचा फटका कंपनीला बसतो. म्हणून जगात काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण विकासावर लक्ष केंद्रीत करत आहेत. वर्क प्लेसमध्ये असलेल्या प्रेशरपासून कर्मचाऱ्यांना काही वेळासाठी राहत मिळावी यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहे. कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना अशा आरामदायक सुविधा देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


कंपनीची भन्नाट आयडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही या कंपनीत काम करावसं वाटेल. खरं तर, दुपारी भरपेट जेवल्यानंतर अनेकांना सुस्ती येते. भारतीय सुस्ती घालविण्यासाठी चहा घेतात. पण या कंपनीने कर्मचाऱ्यांना लंच ब्रेकमध्ये थोडी झोप घेण्याची सुविधा दिली आहे. या कंपनीच्या मते जेवल्यानंतर थोडी विश्रांती घेतली तर कर्मचारी पूर्ण उत्साहाने काम करु शकतात. विश्रांती घेतल्यामुळे कर्मचारी कामामध्ये 100 टक्के योगदान देऊ शकतात. अशाप्रकारची सुविधा जगभरात सगळ्या कंपनीनी द्यावी, असा विचार या व्हिडीओसोबत व्हायरल होतो आहे. 


हा व्हिडीओ लिंक्डइनवर Pascal Bornet नावाच्या यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 9 सेकंदचा हा व्हिडीओमध्ये अनेक यूजर्सला प्रश्न पडला आहे की, हे ऑफिस आहे की रेल्वे स्टेशनवरील रेस्ट रुम. कारण या व्हिडीओतील कंपनीमध्ये लोकांच्या डेक्सवर एकही कंप्यूटर दिसत नाही. या व्हिडीओमध्ये एक तरुणी मोबाईल बघत असते आणि पुढच्या सेकंदला ही मुलगी बसलेल्या खुर्चीचं रुपांतर बेडमध्ये करते. त्यानंतर एक चादर घेऊन ती आराम करते. 



आशियातील काही देशांमधील ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये डुलकी घेणे सामान्य आहे, असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. याबद्दल डॉक्टरांनीही याची शिफारस डुकेली आहे. तुम्हाला असं वाटतं का, की ही संस्कृती इतर देशा पण असली पाहिजे? हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात पाहिला जातोय. या व्हिडीओवर हजारो प्रतिक्रिया येत आहे.