ब्रिटनच्या सार्वजनिक क्षेत्रातील 'नॅशनल हेल्थ सर्व्हिस' (NHS) इंग्लंडने कॅन्सरवर उपचार शोधला आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्यांनी एक लस शोधली आहे. ही लस घेतल्यास कॅन्सरवरील उपचाराचा कालावधी तीन चतुर्थांश कमी होईल असा दावा आहे. ही लस देण्यास फक्त सात मिनिटांचा कालावधी लागतो. जगभरात करोडो लोक कॅन्सरमुळे आपला जीव गमावत असताना, नॅशनल हेल्थ सर्व्हिसची ही लस रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल अशी आशा व्यक्त होत आहे. 


लसीला मंजुरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल हेल्थ सर्व्हिसने आपल्या एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, औषधं आणि आरोग्य सुरक्षा उत्पादन नियंत्रक संस्थेने या लसीला मान्यता दिली आहे. सध्या कॅन्सर रुग्णांना इम्युनोथेरपी अझेझोलिझुमॅब दिली जाते, जी देण्यासाठी अर्धा ते एक तास लागू शकतो. निवेदनानुसार, नवीन कॅन्सरविरोधी लस कमी वेळेत दिली जाऊ शकते आणि रुग्णांना होणार त्रास कमी होईल. यामुळे उपचारातील वेळही वाचेल.


लसीमुळे वेळेची बचत


वैद्यकीय अहवालानुसार, Atezolizumab हे ROG.S कंपनी जेनेंटेकद्वारे निर्मिती करण्यात आलेलं इंजेक्शन आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध आहे जे रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सरच्या पेशी शोधून नष्ट करण्यास मदत करतं. आरोग्यतज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिलं आहे की, एनएचएसच्या रुग्णांना सध्या फुफ्फुस, स्तन, यकृत आणि मूत्राशयासह रक्तसंक्रमणाद्वारे उपचार दिले जातात. एनएचएस इंग्लंडने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी एटेझोलिझुमॅबवर उपचार सुरू करणाऱ्या सुमारे 3600 रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण वेळ वाचवणाऱ्या या इंजेक्शनची निवड करतील अशी आशा आहे. 


भारतात काय स्थिती?


जगभरात लोकांचा मृत्यू होण्यातील प्रमुख कारणांमध्ये कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दरवर्षी कॅन्सरचे 1 कोटी नवी प्रकरणं समोर येतात. दरम्यान, भारताबद्दल बोलायचं गेल्यास आपल्याकडे कोटींहून अधिक प्रकरणांची नोंद होते. भारतात खासकरुन 6 प्रकारचे कॅन्सर रुग्ण आढळतात. यामध्ये फुफ्फुसांचा, तोंडाचा, पोटाचा, स्तनांचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर यांचा समावेश आहे. 


कॅन्सर म्हणजे नेमकं काय आहे?


शरीरात उद्भवणारी एक असामान्य आणि धोकादायक स्थिती, ज्यामध्ये पेशींची असामान्य वाढ होते, त्याला कॅन्सर म्हणतात. आपल्या शरीरातील पेशींचे सतत विभाजन होत राहणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. या प्रक्रियेवर आपल्या शरीराचं पूर्णपणे नियंत्रण असते. पण जेव्हा शरीरातील एखाद्या विशिष्ट अवयवाच्या पेशींवरील नियंत्रण सुटतं तेव्हा त्या असामान्यपणे वाढू लागतात आणि ट्यूमर तयार होतो. यालाचा कॅन्सर असं म्हटलं जातं. बहुतेक कॅन्सर हे ट्यूमरच्या स्वरूपात असतात. पण, रक्ताच्या कॅन्सरमध्ये गाठ नसते.


 
कँसरची लक्षणं काय आहेत?


कॅन्सरची लक्षणं त्याच्या प्रकार आणि जागेनुसार बदलतात. पण शरिरात काही सामान्य लक्षणं दिसतात, जी दिसल्यास तुम्ही दुर्लक्ष करु नका.


- वजन अचानक कमी होणे किंवा वाढणे
- त्वचेमध्ये गुठळ्या तयार होणे
- त्वचेच्या रंगात बदल होणं
- पचन समस्या, बद्धकोष्ठता किंवा अतिसार
- सांधे आणि स्नायूदुखी
- जखम बरी होण्यास वेळ लागणे 
- भूक न लागणे