मुंबई  : चीनच्या वुहान शहरात कोरोना सारख्या धोकादायक विषाणूचा जन्म झाला. त्यानंतर या विषाणूने संपूर्ण जगात हाहाकोर माजवला आहे. चीनमध्ये या व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता तेथील सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे चीन मधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. वुहानमध्ये उदयास आलेला हा विषाणू आता संपूर्ण देशात पसरला आहे. जगात १८४ देशात तब्बल १४ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये जवळपास ८२ हजार पेक्षा जास्त रुग्णांचा या व्हायरसमुळे बळी गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी मध्यरात्री लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर आता चीनमधील नागरिक कोणत्याही परवानगी शिवाय शहरात फिरू शकतात. परंतू परिस्थिती पाहता काही माहिने मास्क लावण्याची विनंती येथील नागरिकांना करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांच्या हातात स्मार्ट फोन असणं आवश्यक असणार आहे. स्मार्ट फोनमध्ये असलेल्या ऍपच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचा शोध घेणं सहज सोपं होणार आहे.


तर  संपूर्ण जगात आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४ लाख ४१ हजार ५८९  वर पोहोचली आहे. तर या धोकादायक विषाणूने आतापर्यंत तब्बल ८२ हजार ९३३ जणांचा  बळी घेतला असून ३ लाख ८ हजार ५४९ एवढे रुग्ण या आजारातून सुखरूप बचवले आहेत. ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.