Ex Girlfriend Sends 100 Texts in a Day: एखादा मुलगा आणि मुलगी रिलेशनशिपमध्ये असतील तर ते एकमेकांबरोबर अनेक गोष्टी शेअर करतात. दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात (Love) बुडलेले असताना दिवसभर गप्पाही मारतात. मात्र काही कारणाने हे नातं तुटलं (Breakup) तर दोघांपैकी एखादी व्यक्ती या गोष्टीचा फारच धसका घेते. एका मुलीबरोबर नुकताच असा प्रकार घडला. ब्रेकअप झाल्याचं सत्य पचवू न शकलेल्या या मुलीचा स्वत:वरील ताबा सुटला आणि तिने असं काही केलं की प्रकरण थेट कोर्टात (Court Case) गेलं आणि कोर्टाने तिला शिक्षा सुनावली.


ब्रेकअपनंतर खरा ड्रामा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलानेच मुलीबरोबरचं नातं संपुष्टात आलं. मात्र यामुळे या मुलीला एवढा मोठा धक्का बसला की ती त्याला दिवसभरात 100 ते 150 कॉल आणि मेसेज करायची. मात्र या मुलीला तिचा एक्स बॉयफ्रेण्ड एकही रिप्लाय द्यायचा नाही. या मुलाचं नाव रेयान आहे आणि मुलीचं नाव मिशेल असं नाही. दोघेही प्रेमात असताना सगळं काही छान सुरु होतं. मात्र अचानक या दोघांचं काही कारणांनी ब्रेकअप झालं. यांच्या लव्हस्टोरीमध्ये ब्रेकअपनंतर फार मोठा ट्वीस्ट आला. हा ट्वीस्ट एवढा धक्कादायक होता की मुलाला थेट कोर्टाची पायरी चढावी लागली.


मुलाने तिच्यावर केला गंभीर आरोप


मिशेल फेल्टन नवाच्या मुलीने आपल्या एक्स बॉयफ्रेण्डबरोबरचं नातं संपुष्टात आल्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. बरं एक्स बॉयफ्रेण्डला संपर्क करण्यापर्यंत प्रकरण नियंत्रणात होतं. मात्र मिशेलने रेयॉनचा पिच्छा पुरवण्याचं ठरवल्याप्रमाणे संपर्क साधण्याच्या प्रयत्नात एका दिवसात 100 ते 150 मेसेज पाठवून हे नातं तोडू नको असं सांगत होती. तू माझ्याबरोबरचं नात का तोडलं? तू माझ्याशी बोलत का नाहीस? आपण पुन्हा कधी भेटणार? यासारखे अनेक प्रश्न मिशेल रेयॉनला विचारायची. मात्र रेयॉनकडून या मेसेजला कोणताही रिप्लाय केला नाही. यानंतर मिशेलने तिच्या प्रियकरावर ड्रायव्हिंग टेस्टमध्ये फसवणूक केल्याचा आरोप केला. मात्र त्यानंतरही तिच्या आधीच्या प्रियकराने तिला उत्तर दिलं नाही. उलट रेयॉनने तिला कोर्टात खेचलं. रेयॉनला त्याच्या घराबाहेर रोज एक गिफ्ट मिळू लागल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली. 21 महिन्यांच्या रिलेशनदरम्यान मिशेल कायमच वर्चस्व गाजवायची, असा आरोप रेयॉनने केला.


कोर्टाने काय म्हटलं?


मिशेल आणि रेयॉनचं नातं मे 2020 ला सुरु झालं आणि फ्रेब्रुवारी 2022 मध्ये हे नातं संपुष्टात आलं. एका वादादरम्यान रेयॉनने मिशेलचं बोट तोडलं आणि याच मुद्द्यावरुन दोघांचं ब्रेकअप झालं. 15 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारीपर्यंत मिशेलने त्याला एक हजारहून अधिक कॉल आणि मेसेज केले. या सर्व मेसेजमध्ये धमक्या वगैरे नव्हत्या मात्र रेयॉनने कंटाळून अगदी आत्महत्या करण्याचाही विचार केला होता. प्रकरण कोर्टात गेल्यानंतर मिशेलने आपली चूक कबुल केली. त्यानंतर न्यायमूर्तींनी मिशेलला 18 महिने रेयॉनपासून दूर राहण्याचे निर्देश दिले. याशिवाय मिशेलला न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आणि रेयॉनला मनस्ताप दिल्याने त्याला नुकसानभरपाई म्हणून 39 हजार देण्याचे आदेश दिले. तसेच एका महिन्यासाठी मिशेलने रिहॅबिटेशन सेंटरमध्ये जावं असंही न्यायमूर्तींनी निकालात सांगितलं.