कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला; चीनमध्ये WHOच्या कामात अडथळे?
कोरोना (Covid-19) महामारीचा फैलाव नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम (World Health Organization team) चीनमध्ये (China) पोहोचली, खरी...पण
बीजिंग : कोरोना (Covid-19) महामारीचा फैलाव नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम (World Health Organization team) चीनमध्ये (China) पोहोचली. परंतु या टीमच्या कामात अडथळे आणायला चीनने (China) सुरूवात केली. कसे, पाहूयात हा रिपोर्ट.
जगभरात आतापर्यंत तब्बल साडे १९ लाख लोकांचे बळी घेणाऱ्या कोरोनाचा व्हायरस नेमका कसा आणि कुठून जन्माला आला, याचा शोध घेण्यास जागतिक आरोग्य संघटनेनं सुरूवात केलीय. मात्र चीननं या टीमच्या कामात अडथळे आणायला सुरूवात केली आहे. WHO ची टीम येण्याच्या एक दिवस आधी वुहानमध्ये चीननं पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला. चीनमध्ये कोरोनाचे 115 नवे रुग्ण आढळल्याने हा निर्णय घेतल्याचा दावा चीनने केला आहे. या पार्श्वभूमीवर WHO ची टीम गुरुवारी वुहान शहरात पोहोचली.
चीनने शास्त्रज्ञांना प्रवेश नाकारला
मात्र या टीममपैकी 2 शास्त्रज्ञांना चीनने एन्ट्री नाकारली. या दोघांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानं त्यांना तूर्तास सिंगापूरमध्येच राहावं लागणार आहे. तर उर्वरित 13 शास्त्रज्ञांना वुहानमध्ये 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. एवढंच नव्हे तर वुहान इन्स्टिट्यूटमध्ये व्हायरसची निर्मिती झाल्याचा आरोप आहे. मात्र या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यापासून WHO टीमला अडवण्यात येणार असल्याचं समजते.
डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात सर्वात आधी कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं होतं. हा व्हायरस नेमका प्राण्यांमधून माणसांमध्ये कसा संक्रमित झाला, याचा शोध जागतिक आरोग्य संघटना घेणाराय. भविष्यात अशाप्रकारे कोणत्याही साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये, यादृष्टीने WHO संशोधन करणाराय. मात्र चीन सरकारच्या असहकार्यामुळं त्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.