इजिप्तमध्ये पुरातत्व विभागाच्या लोकांना दक्षिणेतील राज्य लग्जरमध्ये नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गडप झालेलं सोन्याचं शहर सापडलं आहे.


 1922 मध्ये तुतनखामेन राज्याच्या मकबरेचा शोध लागला होता. तो आतापर्यंतचा सर्वात पुरातन आणि महत्वाचा शोध मानला जात होता. त्यानंतर आता सापडलेले सोन्याचे शहर पुरातत्व विभागाचे यश मानले जात आहे.
 
 इजिप्तचे पुरातत्व विभागाचे मंत्री जही हावासने आपल्या फेसबुक पेजवर यासंबधीची घोषणा केली आहे.
 
 साधारण 3400 वर्ष जुने लग्जर शहर प्रसिद्ध किंग्स वैलीजवळ वाळूमध्ये गडप झालेले आढळून आले. ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी तुतनखामेन राज्याचा मकबरा सापडला होता. 
 
 या मकबऱ्यासह तुतनखामेन राज्याची ममी आणि 10 किलो सोन्याचे मुखवटे आणि अनेक कलाकृती सापडल्या होत्या.
 
 आश्चर्य म्हणजे हा शोध अचानक लागला आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाची टीम कोणतेही प्रयत्न करीत नव्हती. 
 
 तुतनखामेनच्या शवगृहाचा शोध घेत घेत पुरातत्व विभाग या शहरापर्यंत पोहचले आहे.
 
 या शहराचे ना एटन होते. ज्याला 18 व्या राजवंशाचा राजा अमेनोटेप-3 ने वसवले होते.