मुंबई : सौदी अरेबियातील एका वाळवंटात सर्वेक्षणादरम्यान मंदिरे सापडली आहेत. जवळपास 8,000 वर्षे जुन्या मानवी वसाहतींचे अवशेषही येथे सापडले आहेत. एकेकाळी किंडा राज्याची राजधानी असलेल्या अल-फाओमध्ये हा शोध लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल-फाओ (Al-Faw), Al-Rub’ Al-Khali (द एंपटी क्वाटर)  नावाच्या वाळवंटाच्या काठावर वसले होते. saudigazette.com.sa नुसार, सौदी अरेबिया हेरिटेज कमिशनच्या वतीने एक बहुराष्ट्रीय टीम अल-फाओ येथे सर्वेक्षण करण्यासाठी गेली होती. त्या लोकांनी तेथे खोल जमिनीपर्यंत सर्वेक्षण केले. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या.


येथे सापडलेल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे दगडी मंदिर आणि वेदीचे काही भाग. असे मानले जाते की अल-फाओचे लोक येथे धार्मिक विधी करत असत. अल-फाओच्या पूर्वेकडील दगडी मंदिर तुवैक पर्वताच्या एका बाजूला आहे, ज्याला खशेम कारियाह म्हणतात.



याशिवाय आठ हजार वर्षांच्या निओलिथिक काळातील मानवी वसाहतींचे अवशेष येथे सापडले आहेत. याशिवाय विविध कालखंडातील 2 हजार 807 कबरीही या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत.


अल-फाओमध्ये जमिनीखालूनही अनेक धार्मिक शिलालेख सापडले आहेत. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या धार्मिक आकलनाबाबतही अनेक महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे. अल-फाओच्या भौगोलिक रचनेबाबतही अनेक महत्त्वाच्या गोष्टी या सर्वेक्षणातून समोर आल्या.


या अभ्यासातून अल-फाओची जटिल सिंचन प्रणाली देखील उघड झाली. कालवे, पाण्याच्या टाक्यांव्यतिरिक्त, स्थानिक लोकांनी पावसाचे पाणी शेतात वाहून जावे म्हणून शेकडो खड्डे येथे खोदले होते. या शोधांद्वारे, जगातील सर्वात कठीण वाळवंटात लोक पावसाचे पाणी कसे वाचवायचे हे कळते.


दगडांवर बनवलेल्या कलाकृती आणि शिलालेख मढेकर बिन मुनीम नावाच्या माणसाची कथा सांगतात. याशिवाय शिकार, प्रवास आणि युद्धाची माहितीही दगडी कलाकृतींमधून मिळते.


हेरिटेज कमिशन हे सर्वेक्षण करत आहे कारण त्यांना देशातील वारसा जाणून घ्यायचा आहे आणि ते जतन करायचे आहे. हे संशोधन अल-फाओमध्ये सुरू राहणार आहे जेणेकरून आणखी नवीन गोष्टी शोधता येतील.