Baby Expressions Goes Viral: विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की, प्रत्येक बाबींची सखोल माहिती आपल्याला मिळते. अनेकवेळा विज्ञानातील नवनवीन शोधांनी लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. ब्रिटनमधून असंच आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. एका विद्यापीठाच्या अभ्यासातून एक महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली आहे. यामध्ये गर्भात वाढणाऱ्या मुलांचे भाव आईच्या अन्नाच्या चवीवर दाखवण्यात आले आहेत. अहवालानुसार, हा अभ्यास डरहम विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी गरोदर महिलांच्या आहाराचा मागोवा घेतला. या संशोधकांनी महिलांना कोबी आणि गाजराच्या कॅप्सूल दिल्या. तर काही महिलांना कॅप्सूल दिल्या नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएनएनने आपल्या एका रिपोर्टमध्ये या अभ्यासाविषयी सांगितले आहे. गाजराच्या कॅप्सूलचा स्वाद घेतलेल्या आईच्या पोटात जन्मलेली बाळे हसताना दिसतात, तर कोबी असलेल्या कॅप्सूल दिल्यानंतर त्यांनी विचित्र भाव व्यक्त केला. हे पाहून संशोधकांना आश्चर्य वाटले. त्यांनी मुलांचे हे भाव रेकॉर्ड केले आणि छायाचित्रही टिपले. गाजराची चव घेतल्यानंतर पोटात जन्मलेली बाळं हसताना दिसत असल्याचं अल्ट्रासाऊंड रिपोर्टमधून स्पष्ट झालं.  


या प्रयोगातून असेही आढळून आले की मुलाला आईच्या पोटातच चव कळू लागते. गरोदरपणात बाळाची चव आईच्या जेवणावरून ठरू लागते. सध्या सोशल मीडियावर मुलांच्या या एक्सप्रेशनची छायाचित्रे प्रचंड व्हायरल होत आहेत.