मुंबई :  प्रदूषणामुळे (Pollution) देशात एका वर्षात 24 लाख जणांनी जीव गमावलाय. एका अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. पाहूयात नेमकं या अहवालात काय म्हंटलंय. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढतेय. कुठं कारखान्यांचं प्रदूषण, तर कुठं वाहनांचं. या प्रदूषणामुळं जगणं मुश्किल होऊन बसलंय. (fact check shocking pollution led to over 23 lakh premature deaths in india in 2019 highest in world says lancet study)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेच प्रदूषण आता माणसाच्या जीवावर उठू लागलंय. भारतात प्रदूषणामुळे एका वर्षात तब्बल 24 लाख लोकांना जीव गमवावा लागलाय. द लॅन्सेट मॅगझिनच्या अहवालातून ही माहिती पुढे आलीये. 



लॅन्सेट मॅगझिनच्या अहवालानुसार 2019 मध्ये जगभरातील 90 लाख लोकांचा मृत्यू प्रदूषणामुळे झालाय. मृत्यू झालेल्यांपैकी 66.7 लाख मृत्यू हे घरगुती आणि वातावरणातील वायुप्रदूषणामुळे तर 13.6 लाख जणांचा मृत्यू जलप्रदूषणामुळे झालेत. 


यातील सर्वाधिक 24 लाख मृत्यू हे भारतात झालेत. तर दुस-या क्रमांकावर चीन असून तिथं 22 लाख लोकांना प्रदूषणामुळे जीव गमवावा लागलाय. 


चिंताजनक बाब म्हणजे यापूर्वी हवेच्या प्रदूषणाचा स्तर हिवाळ्यात वाढलेला दिसून येत होता. मात्र या अहवालानुसार भारतात हवेचं प्रदूषण वर्षभर असल्याचं स्पष्ट होतंय. 


या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळीच पावलं उचलायला हवीत, अन्यथा कोरोना संपला तरी प्रदूषणारूपी व्हायरस रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात मास्कसक्ती करावी लागेल.